ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा! 'त्या' ठिकाणी चारवेळा केली रेकी, प्रसिद्ध मंदिराची सुरक्षा वाढवली
Jyoti Malhotra Latest News : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा कनेक्शन बिहारच्या भागलपूर येथे जोडला गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ज्योती मल्होत्राबाबत खळबळजनक माहिती समोर

ज्योती एका वर्षात चारवेळा त्या ठिकाणी गेली

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Jyoti Malhotra Latest News : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा कनेक्शन बिहारच्या भागलपूर येथे जोडला गेला आहे. तपासात समोर आलं आहे की, ज्योती 2023 मध्ये अजगैबीनाथ मंदिरात गेली होती. आता पोलिसांनी मंदिर आणि आसपासच्या परिसरात कडक बंदोबस्त लावला आहे. सोशल नेटवर्क आणि स्थानिक संपर्कांचीही कसून चौकशी केली जात आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावादरम्यान ज्योती मल्होत्राला हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली एनआयने ताब्यात घेतलं आहे. तपास यंत्रणांकडून ज्योतीचं दहशतवादी संघटनांशी काही कनेक्शन आहे का? याचा तपास सुरु आहे. ज्योती मल्होत्राच्या नावावर असलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. तिचा सोशल मीडिया अकाऊंट आता बॅन केलं आहे. ज्योतीचं कनेक्शन भागलपूर जिल्ह्याशी जोडलं गेलं आहे, असं तपासात समोर आलं आहे.
हे ही वाचा >> भयंकररर! मुंबईत कोरानाची एन्ट्री दोन रुग्णांचा मृत्यू, बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ
भागलपूरच्या प्रसिद्ध अजगैबीनाथ मंदिरात ज्योती पोहोचली अन्..
पोलीस तपास उघड झालं आहे की, ज्योती 2023 मध्ये चारवेळा भागलपूरच्या सुल्तानगंज येथील प्रसिद्ध अजगैबीनाथ मंदिरात गेली होती. श्रावन महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. ज्योती मंदिर आणि आसपासच्या परिसरात रेकी करत होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या माहितीनंतर, भागलपूर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मंदिर परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिक्षक हृदयकांत यांनी सांगितलं की, ज्योती कुठे कुठे गेली होती आणि कोणत्या लोकांना भेटली, पोलीस याचा तपास करत आहेत.
हे ही वाचा >> 'मी लवकरच येईल..Love You कुश मुश', ज्योती मल्होत्राने टाकला 'लेटरबॉम्ब', पोलिसांना सापडली खतरनाक डायरी
पोलिसांना मिळाली ज्योती मल्होत्राची 'ती' डायरी
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या लेटरची हँडरायटिंग ज्योतीच्या हँडरायटिंगला मॅच होते. या पत्रात ज्योतीने लिहिलंय, सविताला सांग फळ घेऊन ये. घराची काळजी घे. मी लवकरच परत येईन. याशिवाय तिने काही महत्त्वाच्या औषधांची माहितीही या पत्रात लिहिली आहे. ही औषधे घरी घेऊन येण्यासाठी ज्योतीने पत्राद्वारे सांगितलं आहे. पत्राच्या शेवटी ज्योतीने, Love You Kush Mush असं लिहिलं आहे.