भयंकर! मुंबईत कोरोनाची एन्ट्री, दोन रुग्णांचा मृत्यू; BMC चा धक्कादायक रिपोर्ट समोर
Covid 19 News : कोरोना महामारीचे 2020 मध्ये देशावरच नाहीतर जगावरं संकट ओढावलं होते. त्यानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. यात दोन रुग्णांचा मृत्य झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोरोना महामारीचे 2020 मध्ये देशावरच नाहीतर जगावरं संकट ओढावलं होते.

मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे.

मुंबईतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
Covid 19 News : कोरोना महामारीचे 2020 मध्ये देशावरच नाहीतर जगावरं संकट ओढावलं होते. या माहामारीत असंख्य रुग्णांचा मृत्यू झाला होता. एखाद्या जनावरासारखी दैनी अवस्था रुग्णांची झाली होती. काही लोक भयावह परिस्थितीत आपलं जीवन जगत होते. त्यानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. ज्यात मुंबईतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच त्यासोबत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ निर्माण झाली आहे.
हेही वाचा : Pune Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार, बुलेट कारची काच तोडून...
बृहन्मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिपोर्टनुसार, मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 53 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ निर्माण झाली आहे. ज्यांची प्रकृती याआधीच गंभीर असल्याचे सांगितले आहे. दरम्यान कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक रुग्ण कॅन्सर ग्रस्त होता. तर दुसऱ्या रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा किडनी संबंधित गंभीर आजाराने ग्रासले होते.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती आहे. मात्र, आता कोरोनाने डोकं वर काढले आहे. जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 या महिन्यांदरम्यान, कोरोना प्रकरणात घट निर्माण झाली. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच या प्रकरणांमध्ये काही अंशी प्रमाणात वाढ निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती ही गांभिर्याने घेणं गरजेचं आहे. रुग्णांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या जात आहेत.
याचपार्श्वभूमीवर आता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना भयभीत न होण्याचे आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी सावधगिरी बाळगावी असे सांगितलं आहे. अशातच आरोग्य विभागाने मास्क घालणे, गर्दी टाळणे आणि शरीराची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक वाटल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची चाचणी करावी.
हेही वाचा : लोकलमध्ये पुरूषाकडून महिलेला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, विषाणूंचा प्रभाव आधीच्या कोरोनाहून सौम्य आहे. मात्र, वृद्ध आणि आजारपणाने ग्रासलेल्यांना याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष्य देणे गरजेचं आहे.