5 हजाराच्या ड्रोनसाठी 15 लाखाचं मिसाईल खर्च केले... विजय वडेट्टीवार ऑपरेशन सिंदूरबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

वडेट्टीवार म्हणाले, जर कुणी विचारले की युद्ध लहान होतं की मोठं, किती नुकसान झालं, अमेरिकेच्या इशाऱ्यावर हात जोडले गेले होते का, तर त्यात काय चूक आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विजय वडेट्टीवार यांचं ऑपरेशन सिंदूरबद्दल विधान

point

ड्रोन आणि मिसाईलबद्दल काय म्हणाले वडेट्टीवार?

Vijay Wadettiwar on Operation Sindoor : काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त विधान केलंय. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये पारदर्शकता राखावी आणि लोकांना योग्य माहिती द्यावी. तसंच त्यांनी ड्रोन आणि मिसाईलबद्दल केलेल्या एका वक्तव्याचीही सध्या चांगलीच चर्चा होतेय. 

हे ही वाचा >> शिंदेंच्या आमदाराच्या PA च्या रूममध्ये कोट्यवधींचं घबाड सापडलं, सिनेस्टाईल राडा; धुळ्यात काल रात्री काय घडलं?

वडेट्टीवार म्हणाले, जर कुणी विचारले की युद्ध लहान होतं की मोठं, किती नुकसान झालं, अमेरिकेच्या इशाऱ्यावर हात जोडले गेले होते का, तर त्यात काय चूक आहे. त्यांनी आरोप केला की ऑपरेशन सिंदूर दरम्यान 5 हजार ते 15,000 रुपयांचे चीन-निर्मित ड्रोन पाठवण्यात आले होते. त्याचा कोणताही मोठा परिणाम झाला नाही. आमदार विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त विधान केलंय.

विजय वडेट्टीवार म्हणाले, भारताने ते ड्रोन पाडण्यासाठी 15 लाख रुपयांचे क्षेपणास्त्र डागले. सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं. ते म्हणाले की, राफेल विमानं देखील उडवली आणि वापरली गेली.

हे ही वाचा >> वैष्णवी हगवणेचे 4 व्हॉईस मेसेज, मैत्रिणीला दु:खं सांगितलं, 'त्या' चॅटींगमधून समोर आली खळबळजनक माहिती

ऑपरेशन सिंदूरबद्दल विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधीही त्यांनी दहशतवाद्याला कोणाचा धर्म विचारायला वेळ आहे का? असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती.

5 हजार ते 15 हजार रुपयांच्या ड्रोनला मारण्यासाठी लाखो रुपयांचे क्षेपणास्त्र डागण्यात आले. या मोहिमेत सरकारने कोणते निर्णय घेतले, किती खर्च झाला आणि त्याचे परिणाम काय झाले हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी केंद्र सरकारकडून स्पष्ट उत्तर मागितलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp