पवार, ठाकरे, राऊतांसमोर तुफान फटकेबाजी, 'नरकातला स्वर्ग' प्रकाशित करणारे शरद तांदळे कोण?
Sharad Tandale : संजय राऊत यांचं समकालीन राजकारणातील स्थान, त्यांची आजवरची राजकीय भूमिका, ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा यावरुन हे पुस्तक प्रकाशित करणं ही सुद्धा राजकीय जोखीम असू शकत होती याबद्दल शरद तांदळे थेट थेट बोलले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्गचं प्रकाशन
न्यू एरा पब्लिकेशन हाऊसच्या माध्यमातून प्रकाशन
न्यू एरा पब्लिकेशन हाऊसचे शरद तांदळे नेमके कोण?
संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईमध्ये झालं. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार साकेत गोखले आणि संजय राऊतांसोबत आणखी एका व्यक्तिने उपस्थितांशी संवाद साधला. ती व्यक्ती म्हणजे न्यू इरा पब्लिकेशनचे शरद तांदळे. शरद तांदेळे यांच्या या न्यू इरा पब्लिकेशनच्या माध्यमातूनच नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.
म्हणून पुस्तक छापण्याची हिंमत...
संजय राऊत यांचं समकालीन राजकारणातील स्थान, त्यांची आजवरची राजकीय भूमिका, ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा यावरुन हे पुस्तक प्रकाशित करणं ही सुद्धा राजकीय जोखीम असू शकत होती. मात्र, आपण यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे वाचले आहेत, त्यामुळे ही हिंमत आपल्यात सहजच आली असं शरद तांदळे म्हणाले आहेत. शरद तांदळे यांची कारकीर्द यापूर्वीही विशेष राहिली आहे. त्यांनी लिहिलेल्या रावण-राजा राक्षसांचा, द आंत्रप्रेन्युअर ही पुस्तकं ही पुस्तकही चांगलीच चर्चेत होती. शरद तांदळे यांनी या कार्यक्रमात केलेलं भाषण सध्या चांगलंच गाजतंय.
हे ही वाचा >> "आम्ही त्या पंथातले लोक..आम्ही वाकणार नाही...", 'नरकातला स्वर्ग' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संजय राऊतांची तोफ धडाडली
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील वंजारवाडी या छोट्या गावातून सुरुवात करून पुणे आणि लंडनपर्यंत शरद तांदळे पोहोचले. ते एक उद्योजक, लेखक, आणि प्रेरणादायी वक्ते आहेत. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1985 रोजी झाला. त्यांचे आई-वडील दोघंही जिल्हा परिषदेत शिक्षक होते, त्यामुळे शिक्षणावर त्यांचा विशेष भर होता. शरद तांदळे यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून उद्योजकता आणि लेखन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या खास वकृत्वामुळे तरुणांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे.
बीडचा जन्म, लंडनमध्ये पुरस्कार
शरद तांदेळेंनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केलं. त्यांना विज्ञान विषयाची आवड होती, त्यामुळे त्यांनी ११वी आणि १२वी विज्ञान शाखेतून सावरकर विद्यालय आणि बलभीम कॉलेज, बीड येथून पूर्ण केली.










