वैष्णवी हगवणेचे 4 व्हॉईस मेसेज, मैत्रिणीला दु:खं सांगितलं, 'त्या' चॅटींगमधून समोर आली खळबळजनक माहिती

मुंबई तक

Vaishnavi Hagawane : वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की, "मी डीव्हॉर्स घ्यायचा विचार करतेय. मी त्या माणसासोबत खूष नाही. मला खूप झालाय. यावेळी हाईट झाली. त्यांच्या घरच्यांनी मला मारलं, त्यांनीही मारलं. मी राहूच शकत नाही त्यांच्या घरी, खूप वैतागलेय मी." 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वैष्णवी हगवणेचे व्हॉईस मेसेज समोर

point

सासरच्यांनी कसं छळलं, मैत्रिणीला सगळं सांगितलं

Vaishna Hagawane Audio Recording : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आता मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. या प्रकरणात समोर आलेल्या एका ऑडिओ रेकॉर्डींगमुळे आता हगवणे कुटुंब आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता वैष्णवीने ही मृत्यूच्या काही दिवस आधी तिच्या मैत्रीणीशी साधलेल्या संवादाची ऑडीओ क्लिप समोर आली आहे.  यावेळी शशांक हगवणे सोबत प्रेमविवाह करणं हीच माझी सर्वात मोठी चूक आहे असं वैष्णवीने मैत्रिणीजवळ बोलून दाखवलं आहे. 

हे ही वाचा >> वैष्णवी आई होणार म्हटली, तेव्हा शशांक हगवणेने चरित्र्यावर संशय... 2023 मध्ये काय घडलं होतं?

वैष्णवीने आपल्याला सासरच्यांकडून होत असलेला सगळा त्रास आपल्याला मैत्रिणीला बोलून दाखवला होता. वैष्णवी म्हणाली होती की, मी हे लग्न करुन खूप मोठी चूक केली. पण आता मला ही चूक सुधारायची आहे. माझ्या वडिलांना मी हे सांगितलंय, ते मला ही चूक सुधारायला मदत करणार आहेत. 

वैष्णवीने मैत्रिणीला पाठवलेली रेकॉर्डींग काय?

पहिला व्हॉईस मेसेज : "मला पिंकीताई म्हणे,'तुझी सगळीकडे बदनामी करते. तू जे केलं, नाही केलं ते सगळं तुझ्या मैत्रीणींना सांगेल. तू फालतू आहेस, घाणेरडी आहेस, एखाद्याच्या घराचं वाटोळं करते. शशांकसोबतही लॉयल नव्हती."

दुसरा व्हॉईस मेसेज : "दाजी (शशांक) बघत होते मला मारताना, नंतर त्यांनीही माझ्यावर हात उचलला. कारण हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी ठरवलंय की डिव्होर्स देणार आहे. मी सांगितलंय पप्पाला. पप्पा म्हटले आपण करु यावर विचार..."

हे वाचलं का?

    follow whatsapp