"टाका त्यांच्यावर धाडी..बसवा त्यांना सुद्धा जेलमध्ये..", राऊतांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे कडाडले!
Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या नरकारतला स्वर्ग पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विरोधकांवर सडकून टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संजय राऊतांचा 'नरकातला स्वर्ग' पुस्तक प्रकाशन सोहळा पडला पार

"घर जर ढेपाळळं तर लढवय्या लढू शकत नाहीत.."

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech : "मला जर कोणी विचारलं, अमित शाहा तुमच्या घरी आले होते का? बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का? मी सांगेन मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील..उपकार हे मोजायचे नसतात. उपकार करायचे असतात. उपकाराची फेड कृतघ्नतेनी करायची का अपकाराने करायची हे ज्याच्या त्याच्यावर असतं. जर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि पीएमएलए तो लावण्याचा अधिकार दिल्लीच्या सरकारला असेल, तर तो अधिकार आमच्या राज्याच्या सरकारला पाहिजे. टाका त्यांच्यावर धाडी. बसवा त्यांना सुद्धा आतमध्ये.
संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले?
हे तिघे भोगून आलेत. संजय राऊत, अनिल देशमुख यांच्याकडे द्या ना चार्ज..मग ते सांगतील त्यांच्यावर धाडी टाका..टाका त्यांना तुरुंगात आणि सिद्ध करा..तुम्ही निर्दोष आहात. या प्रकाराविरोधात लढत राहिलं पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
हे ही वाचा >> 'आका' वाल्मिक कराडच्या गुंडांनी तरुणाला गुरांसारखं बडवल्याचा नवा Video आला समोर, केवळ भयंकर...
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "घर जर ढेपाळळं तर लढवय्या लढू शकत नाहीत. संजयच्या आईने आणि कुटुंबियांनी जे काही धाडस दाखवलं, त्या धाडसाला सीमाच नाहीय. संजयला अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी त्याच्या घरी गेलो, आम्ही त्यांना धीर देण्याऐवजी संजयची आई आणि त्यांनी आम्हाला धीर दिला. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटत असतात. काही कायमची सोबत राहतात. काही संधी साधू असतात. संधी मिळाल्यानंतर पळून जातात. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची परीक्षा शिवसेनाप्रमुख घेतात. आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं, त्यांच्याकडून कोणी काय घेतलं, हे ते बघतायत. त्यांचं एक वाक्य आहे, शंभर दिवस शेळ्यांसारखे जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं जगा".
हे ही वाचा >> हनिमूनच्या रात्री नवरा-नवरीत असं काही घडलं की, सकाळी अख्ख्या गावाला कळलं! विषय एकदमच हार्ड!
"जो नरकात स्वर्ग शोधतो किंवा जो नरकाचा स्वर्ग बनवतो, तो काय दाटणीचा असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला आणि हिंदूंना एक आत्मविश्वास दिला. एक जिद्द दिली. नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात आपली हालत काय असती, हे वेगळं सांगण्याची गरज नाहीय. कदाचित ते बघतायत की, मी जे काही दिलं ते बघणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणारे किती आहेत..नर्क या कल्पना खऱ्या आहेत की खोट्या आहेत, कल्पना नाही..जिथे आहोत तिथे आपण आनंदाने राहावं. दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही, तर त्रास तरी देऊ नये. एवढं जरी माणसानं पाळलं तरी मला असं वाटतं आपण आयुष्य जगलो. आज आपण जे काही बघतोय, त्याल लोकशाही मानायची का हुकूमशाही हा प्रश्न आणि त्याचं उत्तरही सोपं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.