शिंदेंच्या आमदाराच्या PA च्या रूममध्ये कोट्यवधींचं घबाड सापडलं, सिनेस्टाईल राडा; धुळ्यात काल रात्री काय घडलं?
अखेर रात्री 11 वाजता पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. रूम क्रमांक 102 चे कुलूप तोडल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड आढळली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अनिल गोटे यांनी 'त्या' रूमबाहेर ठिय्या मांडला

रुम नंबर 102 मध्ये नेमकं काय घडलं?

अनिल गोटेंनी जसे आरोप केले, तसंच घडलं...
Dhule Cash Seized : धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील विकासकामांच्या पाहणीसाठी आलेल्या 22 आमदारांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्यादरम्यान मोठं प्रकरण घडलंय. धुळे शहरातील शासकीय विश्रामगृह (गुलमोहर रेस्ट हाऊस) येथील रूम क्रमांक 102 मधून पोलिसांनी 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून, माजी आमदार अनिल गोटे यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. अगदी सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारखं काल धुळ्यात या सगळ्या नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. आमदारांच्या या शिष्टमंडळाच्या समितीमध्ये सत्ताधारी पक्षांचे आमदार होते.
हे ही वाचा >> चेहरा भोळा अन्... ज्योती मल्होत्राने कबूल केलं 'ते' सत्य, हादरवून टाकणारी कहाणी!
अर्जुन खोतकर यांच्या PA च्या नावावर रूम
जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी गेस्ट हाऊसमध्ये रूम बूक केली होती. 15 मे पासून गेस्ट हाऊसमधील रूम क्रमांक 102 राखीव केली होती. माजी आमदार अनिल गोटे यांना मिळालेल्या माहितीनुसार, या रूममध्ये कोट्यवधी रुपये असल्याचा संशय होता. त्यांनी रविवारी रात्री या रूमबाहेर कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलन केलं. प्रशासनाला याची माहिती देऊनही दोन ते तीन तास कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्यानं संशय अधिक बळावला.
रूम नंबर 102 मध्ये काय सापडलं?
हे ही वाचा >> वैष्णवी हगवणेचे 4 व्हॉईस मेसेज, मैत्रिणीला दु:खं सांगितलं, 'त्या' चॅटींगमधून समोर आली खळबळजनक माहिती
अखेर रात्री 11 वाजता पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. रूम क्रमांक 102 चे कुलूप तोडल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड आढळली. रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मोजणी मशीनच्या साहाय्याने ही रक्कम मोजण्यात आली. यात 1 कोटी 84 लाख रुपये जप्त करण्यात आले. अनिल गोटे यांनी या रकमेची आकडेवारी 5 कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली आहे.
पैसे कुणासाठी होते, अनिल गोटे काय म्हणाले?
माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी थेट विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या खाजगी स्वीय सहाय्यकावर आरोप केलाय. या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं. विकासकामांमधील त्रुटी लपवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळातील सदस्यांना ही रक्कम पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. "ही रक्कम कोणी दिली आणि कोणासाठी होती, याचा तपास व्हायला हवा," अशी मागणी गोटे यांनी केली आहे.
निष्पक्षपाती तपास होणार का?
दरम्यान, ही रक्कम कुठून आली आणि कुणाला दिली जाणार होती, याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही रक्कम विकासकामांच्या पाहणीशी संबंधित आहे की अन्य कोणत्या कारणासाठी आणली गेली, याचा शोध घेतला जातोय. या प्रकरणाने धुळे शहरात चर्चेला उधाण आलं असून, राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शासकीय विश्रामगृहात इतक्या मोठ्या रकमेचा साठा का आणि कोणासाठी होता, याचं उत्तर तपासातून समोर येणार का हे पाहावं लागणार आहे.