अटक केली की आरोपी स्वत:हून हजर झाले? सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले 3 सवाल

मुंबई तक

Vaishnavi Hagawane Case : गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेल्या या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं कार्यरत होती. दरम्यान आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजेंद्र हगवणे यांच्या अटकेवर काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

point

सुषमा अंधारेंचे 3 सवाल, रोख कुणावर?

Rajendra Hagawane Arrested : पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज पहाटे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली. गेल्या 16 मे रोजी वैष्णवी यांनी राहत्या घरी आपलं जीवन संपवलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती काय?

हे ही वाचा >> रिनाने पुतण्यासाठी नवऱ्यासोबत केला कांड, पुतण्याने पॉर्न व्हिडिओ डाऊनलोड केले अन् काकीसोबत...

आज (23 मे) पहाटे 5:30 वाजता अटक वाजण्याच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना ताब्यात घेतलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेल्या या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं कार्यरत होती. अटकेनंतर स्वारगेटमधील ज्या हॉटेलमध्ये हे दोघं थांबले होते, तिथले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. एका फुटेजमध्ये ते गाडीत बसताना दिसत आहेत, तर दुसरीकडे ते जेवणाच्या टेबलवर बसलेले दिसतायत.

सुषमा अंधारेंचे सवाल

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणांमध्ये पहाटे साडेचार वाजता दीर आणि सासरा यांना अटक झाली. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले की आरोपी स्वतःहून हजर झाले? हे अजून स्पष्ट झाले नाही. जर आरोपी स्वतःहून हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे हे गोष्ट अधिकच जात अधोरेखीत होते.

हे ही वाचा >> अमानुष मारहाण, मोबाईल हिसकावून पळाला.... मयुरीने CCTV दाखवले, हगवणे कुटुंबानं कसं छळलं ते सांगितलं

काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले असं जेव्हा आत्ता सहा दिवसापासून रुसून बसलेला महिला आयोग सांगत असेल, तर वैष्णवीचा जीव गेल्यापासून पाच दिवस होऊन गेल्यानंतरही सरकार ॲक्शन मोडमध्ये का आले नाही?  

वैष्णवी प्रकरणात आरोपींना अटक होत असतानाच नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, या प्रकरणात सरकार आणि सुस्तावलेला आयोग ॲक्शन मोडमध्ये कधी येणार आहे?

हे वाचलं का?

    follow whatsapp