अमानुष मारहाण, मोबाईल हिसकावून पळाला.... मयुरीने CCTV दाखवले, हगवणे कुटुंबानं कसं छळलं ते सांगितलं
वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांच्यावर आता त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी मयुरीनेही आरोप केले आहेत. मयुरी हगवणे यांनाही शशांकने मारहाण होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वैष्णवीच्या पतीवर मयुरीचे गंभीर आरोप

हगवणेंनी सुनांना कसं छळलं, CCTV समोर आला
Mayuri Hagawane Allegations on Shashank Hagawane : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने 16 मे रोजी आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ निर्माण केली आहे. हगवणे कुटुंबाच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांकडून केला जातोय. त्यातच आता या प्रकरणात आणखी खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत.
हे ही वाचा >> वैष्णवीची जाऊ मयुरी म्हणाली, "हगवणेंनी मलाही त्रास दिला, तिच्याशी बोलू दिलं नाही, पण माझ्या नवऱ्याने..."
वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांच्यावर आता त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी मयुरीनेही आरोप केले आहेत. मयुरी हगवणे यांनाही शशांकने मारहाण होती. यासंदर्भातील सीसीटीव्ही समोर आले असून, त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शशांकने मयुरीला मारहाण केली आणि त्यानंतर मयुरीचा मोबाईल घेऊन पळतानाचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
मयुरी जगताप ही हगवणे कुटुंबातील मोठी सून असून, त्यांनाही शशांकने मारहाण केली होती. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मयुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शशांकने त्यांना मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन तो घेऊन पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेजमुळे या घटनेची खात्री पटली असून, पोलिसांनी याप्रकरणी काय तपास केला हे पाहणं महत्वाचं आहे.
मयुरीने तक्रार केली होती, पण ते प्रकरण दाबलं...
मयुरी म्हणाल्या होती, मी नोव्हेंबरला त्यांची तक्रार दिली होती. 8:30 वाजता मी पौड पोलीस स्टेशनला गेले. पण पोलिसांनी 9:30 पर्यंत काहीच तक्रार घेतली नाही. तक्रार करू नका असं म्हणत तिथल्या महिला अधिकाऱ्यांनी दबाव आणला. नंतर फरार झाले आणि माझ्या भाऊ आणि आईविरोधात तक्रार केली.
मयुरीच्या आईनेही केले गंभीर आरोप
मयुरी हंगवणे यांच्या आई म्हणाल्या, "मी सासूला सांगितलं होतं त्रास देऊ नका. मारहाण झाली, त्यादिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार केली. पण त्यांनी दबाव टाकून त्यांनी ते दाबलं. पण ते मोठे लोक असल्यानं त्यांचं काही चाललं नाही. माझी मुलगी काय आणि वैष्णवी काय दोन्ही माझ्याच मुली होत्या."