आश्चर्यच! 4 हात-पाय 2 हृदय आणि एक डोकं, अनोख्या बाळाचा जन्म

मुंबई तक

ADVERTISEMENT

bihar chhapra unique child born four hand four leg and head viral baby
bihar chhapra unique child born four hand four leg and head viral baby
social share
google news

Bihar Viral News : बिहारच्या (Bihar) छपरा शहरातील खाजगी नर्सिंग होममध्ये एका महिलेने असामान्य बाळाला (Child Born) जन्म दिला आहे. या बाळाला 4 हात, 4 पाय, 4 कान, 2 हदय, पाठीचा कणा आणि एक डोकं आहे. या बाळाला जन्म दिलेल्या महिलेचे नाव प्रिया देवी आहे. महिलेचे सिजेरीयन (caesarean) करून ही डिलिव्हरी करण्यात आली होती. या अनोख्या बाळाच्या जन्माने आता रूग्णालयाचे कर्मचारी देखील हैराण झाले आहे. तसेच या चिमुकलीच्या जन्मानंतर ती परीसरात कुतुहलाचा विषय बनली होती. (bihar chhapra unique child born four hand four leg and head viral baby)

ADVERTISEMENT

मेडीकल टर्ममध्ये अशा बाळांना जुळे म्हणतात. ज्यामध्ये ही मुल जन्मापासूनच एकमेकांशी जुळलेली असतात. भारतासह जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यामध्ये जुळ्या मुलांना ऑपरेशननंतर तज्ञ डॉक्टरांनी वेगळे केले आहे. मात्र या बाळाचे 4-4 हात-पाय, 2 हदय, दोन पाठीचे कणे आणि एक डोकं. अशा घटना खुपच कमी घडतात, अशी माहिती नर्सिंग होमचे संचालक डॉ. अनिल कुमार यांनी दिली आहे.

हे ही वाचा : Video : शेतकऱ्याने नादच केला…चक्क थार गाडीने नांगरली एक एकर शेती

दरम्यान अशा घटना तेव्हाच घडतात जेव्हा महिलेच्या गर्भाशयात एकाच अंड्यातून दोन बाळ जन्म घेतात. या प्रक्रियेत जर दोघेही वेळेत वेगळे झाले तर जुळी मुले जन्माला येतात, परंतु काही कारणाने दोघे वेगळे झाले नाहीत तर अशा परिस्थितीत जुळी मुले जन्माला येत नाहीत. अशा मुलांच्या जन्माच्या वेळेसही गर्भवती महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, असे देखील डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले. महिलेचे सिजेरीयन करून या बाळाला जन्म दिला होता. मात्र बाळाच्या जन्माच्या 20 मिनिटानंतर त्याचा मृत्यू झाला होता, असे देखील अनिल कुमार यांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

बाळाचा 20 मिनिटांनी मृत्यू

या अनोख्या बाळाला जन्म दिलेल्या महिलेचे नाव प्रिया देवी आहे.ती रिविलगंजमध्ये राहते. महिलेचे हे पहिलेच बाळ होते. महिला या बाळाच्या जन्मावरून आधीच चिंतीत होती. महिलेची डिलिव्हरी ही सिजेरीयन पद्धतीने करण्यात आली. जर ही डिलिव्हरी सिजेरीयन पद्धतीने झाली नसती, तर महिलेच्या जीवाला धोका होता. सध्या गर्भवती महिला ही निरोगी असून तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा :  Cyclone Biparjoy : धडकी भरवणारा वेग! चक्रीवादळ सध्या कुठेय? पहा Live Tracker

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT