Kerala: अमिबा नाकातून घुसला आणि मेंदू कुरतडला,15 वर्षाच्या मुलाचा भयंकर मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

brain eating amoeba kerala Alappuzha 15 years old boy died kerala shocking story
brain eating amoeba kerala Alappuzha 15 years old boy died kerala shocking story
social share
google news

Brain Eating Amoeba: केरळच्या आलपुझा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलाचा मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे (Brain Eating Amoeba) संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुषित पाण्यात राहणाऱ्या अमिबामुळे मुलाचा बळी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाकावाटे हा अमिबा शरीरात शिरला होता आणि त्याने मेंदूत शिरकाव करून संसर्ग झाला होता. या संसर्गात अमिबा मेंदू खाऊन टाकतो, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना उघडकीस येताच राज्यात खळबळ माजली आहे. त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही अलर्ट जारी केला आहे. (brain eating amoeba kerala 15 years old boy died kerala shocking story)

ADVERTISEMENT

राज्याचे आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलप्पुझा जिल्ह्यातील पनावल्ली परीसरात राहणाऱ्या 15 वर्षाचा मुलाला प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलाइटीक नावाच्या आजाराचा संसर्ग झाला होता. राज्यात याआधी देखील दुर्मिळ संसर्गामुळे मृत्यू झाल्याची पाच प्रकरणे समोर आली होती. पहिले प्रकरण 2016 साली आलप्पुझाच्या तिरूमाला वार्डमधून समोर आले होते. त्यानंतर 2019 आणि 2020 मध्ये मलप्पुरम मधून एक-एक प्रकरणे समोर आली होती. 2022 मध्येही कोझिकोड आणि त्रिशुरमधून एक-एक प्रकरण समोर आले होते. या सर्व प्रकरणात मेंदूत संसर्ग झालेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या दुर्मिळ संसर्गात मृत्यूचे प्रमाण 100 टक्के असते, असे देखील जॉर्ज यांनी सांगितले आहे.

कसा मृत्यू होतो?

मंत्री जॉर्ज यांनी पुढे सांगितले की, साचलेल्या पाण्यात सापडणाऱ्या अमिबामुळे हा संसर्ग होतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत तेव्हा संसर्ग होतो, जेव्हा हा अमिबा नाकावाटे शरीरात शिरलेला असतो. हा अमिबा इतका धोकादायक असतो की तो मेंदुच्या पेशी खाऊन टाकतो आणि संसर्ग पसरवतो. या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. Naegleria Fowleri नावाचा हा अमिबा हा इतका छोटा असतो की त्याला मायक्रोस्कोपशिवाय पाहता येणार नाही. हा सुक्ष्मजीव माणसाचा जीव घेतो. या घटनेत देखील 15 वर्षाचा मुलगा दुषित पाण्यात अंघोळीसाठी उतरला होता. या दरम्यान हा अमिबा नाकावाटे त्याच्या शरीरात शिरला आणि त्याने मेंदूत शिरकाव करत पेशी खाऊन संसर्ग पसरवला, ज्यामुळे मुलाचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

आजाराची लक्षणे काय?

एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत या अमिबाने शिरकाव केल्यास त्याला मृत्यूपूर्वी अनेक लक्षणे दिसतात. जसे या आजारात संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, डोकेदुखी, उलटी, फिट अशी लक्षणे दिसतात. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरीकांना दुषित पाण्यात अंघोळ करण्यास मनाई केली आहे. त्याचसोबत नागरीकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT