प्रचंड चर्चेत असलेली PM Svanidhi Yojana आहे तरी काय? कसा कराल अर्ज अन् किती मिळतं लोन…

प्रशांत गोमाणे

देशभरातील तब्बल 78 लाख रस्ते विक्रेत्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे पीएम स्वनिधी योजना नेमकी काय आहे? या योजनेत किती कर्ज मिळते? आणि योजनेसाठी कसे अर्ज करता येईल. हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

budget 2024 nirmala sitharaman pm svanidhi yojana how to apply how much loan available how to avail benefits read full story
budget 2024 nirmala sitharaman pm svanidhi yojana how to apply how much loan available how to avail benefits read full story
Google CTA

Budget 2024 Nirmala Sitharaman,PM Svanidhi Yojana : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज शुक्रवारी सहाव्यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या कार्यकाळातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी पीएम स्वनिधी योजनेची (PM Svanidhi Yojana)  माहिती दिली. या योजनेचा आतापर्यंत देशभरातील तब्बल 78 लाख रस्ते विक्रेत्यांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे ही योजना रस्ते विक्रेत्यांसाठी लाभदायी ठरताना दिसते आहे. त्यामुळे पीएम स्वनिधी योजना नेमकी काय आहे? या योजनेत किती कर्ज मिळते? आणि योजनेसाठी कसे अर्ज करता येईल. हे जाणून घेऊयात. (budget 2024 nirmala sitharaman pm svanidhi yojana how to apply how much loan available how to avail benefits read full story)

नेमकी योजना काय?

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत केंद्रसरकारने रस्ते विक्रेत्यांसाठी ही योजना सूरू केली आहे. या योजनेचे नाव पीएम स्वनिधी योजना आहे. या योजने अंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना कोणतेही तारण न ठेवता कर्जाची सुविधा दिली जाते. म्हणजे रस्त्यावरील विक्रेत्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळते.

हे ही वाचा : Chhatrapati Sambhajiraje: ‘लोकसभा लढवायची असेल तर…’ संभाजीराजेंसमोर ‘मविआ’ने ठेवली विचित्र अट!

50 हजारापर्यंत मिळत लोन

या योजनेची सुरूवात जून 2020 म्हणजेच कोरोना काळात झाली. या योजनेअंतर्गत सरकार तीन विविध टप्प्यात रस्त्यावरील विक्रेत्यांना लोन देते. ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांना 10 हजार ते 50 हजारापर्यंत लोन मिळते. पहिल्यांदा या योजनेत 10 हजार रूपयापर्यंत लोन देण्यात येते. या लोनची परतफेड लाभार्थ्याला 12 महिन्याच्या आत करायची असते. ज्यावेळेस संबंधित लाभार्थी पहिले लोन चुकवतो, त्यावेळेस त्याला दुसऱ्यांदा लोन घेता़ येते. तसेच दुसऱ्यांदा लाभार्थ्यांला 20 हजारापर्यंत लोन मिळते. तर तिसऱ्या वेळेस 50 हजारापर्यंत लोन मिळते.

विशेष म्हणजे या योजनेचा रस्त्यावरील विक्रेत्यांना आणखीण एक फायदा होतो. तो म्हणजे ज्यावेळेस एखादा लाभार्थी त्याचे लोन वेळेत चुकवतो. त्यावेळेस सरकार त्याला व्याजदरावर 7 टक्के सबसिडी देते.दरम्यान आतापर्यंत देशभरातील 78 लाख स्ट्रीट वेंडर्सने या योजनेचा फायदा घेतला आहे. यामधील 2.3 लाख लोकानी तिसऱ्या टप्पातील लोन मिळाले आहे, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.