Eknath Shinde : "...तर उबाठा सेनेचा तिहार होईल", घोसाळकरांच्या हत्येनंतर शिंदेंचा घणाघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना काय दिले उत्तर?
Eknath shinde Criticise to uddhav thackeray over abhishek ghosalkar murder
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

point

अभिषेक घोसाळकर प्रकरणावर शिंदेंचे भाष्य

point

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मांडली भूमिका

Eknath Shinde Uddhav Thackeray Abhishek Ghosalkar : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं. मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भित इशारा दिला. पालघर जिल्ह्यातील मनोर येथे झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी गुन्हेगारी घटनांवरून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "कुणी कितीही आव्हानं दिली तरी बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचा शिवसैनिक जेव्हा पेटून उठतो, तेव्हा वाघाचं कातडं पांघरून आलेल्या लांडग्याला लोळवल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे."

तेव्हा तुम्ही नितीश कुमारांचं नाव काढलं नाही, शिंदेंचा ठाकरेंना सवाल

एकनाथ शिंदे याच मुद्द्यावर भाष्य करताना म्हणाले, "काल कुणीतरी म्हणालं की, महाराष्ट्राचा बिहार झालाय. अरे बिहार जेव्हा नितीश कुमार इंडिया आघाडीमध्ये होते, तेव्हा तुम्ही नितीश कुमारांचं नाव काढलं नाही. कुणीतरी म्हणालं, पोलिसांचे हात मोकळे ठेवा. पोलीस गुंडांचा बंदोबस्त करतील. पोलिसांचे हात मोकळे आहेत. आज गृहमंत्री समर्थ आहेत. सक्षम आहेत. ज्यांच्या काळात पोलिसांचे हात यांनी मोकळे सोडले, त्याने शंभर कोटी गोळा केले आणि गृहमंत्री पण जेलमध्ये गेले."

हे वाचलं का?

"त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात जे गुन्हे केलेले आहेत, त्याचा पाठपुरावा केला, तर मला वाटतं उबाठा सेनेचे तिहार झाल्याशिवाय राहणार नाही. असं काम तुम्ही केलं. खरं म्हणजे उल्हासनगर आणि कल्याणमध्ये झालेल्या घटना दुर्दैवीच आहेत. अशा घटना होता कामा नये. पण, त्या घटनांचं राजकारण होतंय, हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे", अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर शिंदे काय बोलले?

मॉरिस नरोन्हा याने माजी नगरसेवक अभिषेक घोसाळक यांची हत्या केली. या घटनेवर बोलताना शिंदे म्हणाले, "अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. एक तरुणी मुलगा जिवानिशी जातो. एक जेव्हा नवीन उमेद असते, तेव्हा त्याचा जीव जातो, हे आमच्यासाठी देखील वेदनादायी आहे. परंतु त्याच देखील आपण राजकारण करता. त्यामध्ये म्हणता की, गोळ्या मारणारा कोण आहे? फेसबुक लाईव्ह आपण बघितलं. पोलीस तपास करताहेत. जे कुणी गुन्हेगार आहेत, त्यांना अटक करतील. परंतू, त्याच्या हत्येमागचं कारण सोयीस्करपणे दुर्लक्ष करून सरकारवर टीका करण्याचा हा कुठला प्रकार आहे", असा सवाल शिंदेंनी केला.  

ADVERTISEMENT

"जे काय आहे, ते सत्य कधीही दाबलं जाणार नाही. सत्य लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे. कुणाला पाठिशी घालणार नाही. सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन हे जे हत्या आत्महत्यांचे प्रकरण झाले. त्याचे पुरावे मिटवण्याचे काम केलं. तेव्हा त्यांना आठवलं नाही", असे म्हणत शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष्य केले.  

"अंबानींच्या घराखाली जेव्हा बॉम्ब ठेवले गेले, तेव्हा त्यांनी विचार केला नाही की, आपला महाराष्ट्र आहे की आणखी काय आहे. याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. हनुमान चालीसा म्हटली म्हणून आमदार-खासदाराला तुरूंगात टाकलं. नारायण राणेंना टीका केली म्हणून जेवणाच्या ताटावर उठवण्याचे काम केले", ठाकरे सरकारच्या काळातील या जुन्या घटनांना उल्लेख करत शिंदेंनी टीकास्त्र डागलं. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT