Munawwar Rana : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे निधन

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Famous poet Munawwar Rana passes away
Famous poet Munawwar Rana passes away
social share
google news

“चलती फिरती हुई आँखों से अज़ाँ देखी है
मैं ने जन्नत तो नहीं देखी है माँ देखी है”

ADVERTISEMENT

असं म्हणत आईचे महात्मे सांगणारा एक शायर विसावला. आज एक सर्वमान्य आवाज शांत झाला. आईवर अनेक कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लखनौच्या पीजीआयमध्ये उपचार सुरू होते. ९ जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. वयाच्या ७१ व्या वर्षी राणा यांनी अखेरचा श्वास घेतला. मुनव्वर यांना किडनी आणि हृदयाशी संबंधित आरोग्याच्या समस्या होत्या.

अनेक दिवसांपासून होते आजारी

पीटीआयच्या वृत्तानुसार, मुनव्वर राणा यांची मुलगी सुमैया हिने याबद्दल माहिती दिली. रविवारी रात्री उशिरा राणा यांचे रुग्णालयात निधन झाले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे वाचलं का?

मुनव्वर यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. मुनव्वर राणा यांचा मुलगा तबरेज याने सांगितले की, आजारपणामुळे ते गेल्या 14-15 दिवसापासून रुग्णालयात होते. त्यांना प्रथम लखनौ येथील मेदांता येथे आणि नंतर एसजीपीजीआयमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी (१४ जानेवारी) रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंसोबत जाण्याला मी विरोध केला कारण…”, देवरांचं खळबळ माजवणारा खुलासा

गेल्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुनव्वर राणा यांना लखनौच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. राणा यांची मुलगी आणि सपा नेत्या सुमैया राणा यांनी सांगितले होते की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून वडिलांची तब्येत खराब होती. डायलिसिस दरम्यान त्यांना पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना दाखल केले. त्याच्या पित्ताशयात काही समस्या होती, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने ते व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टीमवर गेले.

ADVERTISEMENT

या मुद्द्यांमुळे राहिले वादात

मुनव्वर राणा हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात राहिले. 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुनव्वर राणा म्हणाले होते की, “योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ते उत्तर प्रदेश सोडतील. मी दिल्ली-कोलकाताला जाईन. माझ्या वडिलांनी पाकिस्तानात जाणे मान्य केले नाही पण आता मला हे शहर, हे राज्य, माझी माती सोडावी लागेल.”

ADVERTISEMENT

मुनव्वर म्हणाले होते की, “पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर हात ठेवून वाईट केले. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशात भेदभाव केला. या सरकारने फक्त सबका साथ सबका विकासाचा नारा दिला, काही केले नाही. त्यांचा मर्जी झाली तर मुस्लीम मुक्त उत्तर प्रदेश करतील. दिल्ली, कोलकाता, गुजरात माझ्यासाठी अधिक सुरक्षित आहेत.”

हेही वाचा >> “जर मोदी म्हणाले की, काँग्रेस चांगला पक्ष तर…”, देवरांचा ठाकरे-काँग्रेसवर वार

2021 मध्ये मुनव्वर राणा यांनी मुलगा तबरेजवर झालेल्या गोळीबारानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. तर 2020 मध्ये मुनव्वर यांनी कार्टूनच्या वादातून फ्रान्समधील एका शाळेतील शिक्षकाची गळा दाबून हत्या केल्याच्या घटनेचे समर्थन केले होते.

“धर्म हा आईसारखा असतो. कुणी वाईट व्यंगचित्र काढले किंवा तुमच्या आईला किंवा धर्माला शिव्या दिल्या, तर रागाच्या भरात असे करायला भाग पाडले जाते”, असे मत त्यांनी मांडले होते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मुनव्वर यांनी ट्विटरवर एक शेर लिहिला होता, त्यावरून वाद निर्माण झाला होता. या शेरामध्ये राणा यांनी संसद उद्ध्वस्त करून शेत तयार करणे आणि सावकरांची गोदामे जाळा असे म्हटलेले होते. मात्र, वादामुळे त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

कोण होते मुनव्वर राणा?

मुनव्वर राणा हे प्रसिद्ध कवी आणि लेखक होते. त्यांनी उर्दू व्यतिरिक्त हिंदी आणि अवधी भाषांमध्ये लेखन केले. मुनव्वर यांनी आपल्या गझल वेगवेगळ्या शैलीत प्रकाशित केल्या. त्यांना उर्दू साहित्यासाठी 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2012 मध्ये शहीद शोध संस्थेतर्फे माती रतन सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. तब्बल वर्षभरानंतर त्यांनी अकादमी पुरस्कार परत केला. तसेच वाढत्या असहिष्णुतेमुळे त्यांनी सरकारी पुरस्कार न स्वीकारण्याची शपथ घेतली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT