Ganesh Chaturthi 2024: 'गणेश चतुर्थी'चा उत्सव 10 दिवसच का साजरा केला जातो?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी, गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते.

point

गणेशोत्सव फक्त 10 दिवसच का साजरा केला जातो? 

Ganesh Chaturthi 2024 : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी, गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. शिवपुराणानुसार या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला होता. विद्वानांनुसार हा उत्सव केवळ एक दिवस साजरा करण्यात येत होता. परंतु, सध्या हा उत्सव 10 दिवस साजरा करण्यात येत आहे आणि 11 व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात येते. पण तुम्हाला माहित आहे का गणेशोत्सव फक्त 10 दिवसच का साजरा केला जातो? चला तर जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे. (ganesh chaturhti 2024 how many days we can keep lord ganesha at home)

ADVERTISEMENT

गणपतीला आद्य उपासक मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने होते. गजाननाचे पूजन केल्याने माणसाच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही अशी मान्यता आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला अनेकांच्या घरात गणपतीची स्थापना केली जाते. यंदाचा गणेशोत्सव 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. 

गणेशोत्सव फक्त 10 दिवसच का साजरा केला जातो? 

पौराणिक कथेनुसार, गणेशोत्सवाबाबत पुराणात अनेक कथा आहेत. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाचा जन्म झाला असे मानले जाते. हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सव 10 दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे वेद व्यासजींनी भगवान गणेशाला महाभारत ग्रंथ लिहिण्याची विनंती केली होती, तेव्हा बाप्पाने 10 दिवस एक क्षणही न थांबता  महाभारत लिहिले होते. जेव्हा वेदव्यासजींनी पाहिले, बाप्पाचे तापमान खूप जास्त वाढले होते, त्यामुळे त्यांनी 10 व्या दिवशी त्यांना नदीत आंघोळ घातली. तेव्हापासून गणेशोत्सव सुरू झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : Badlapur : 'DCP चा फोन आला, FIR बदललं...ते प्रकरण दाबण्यासाठी...' कुटुंबीयांनी सांगितली Inside Story

गणेशोत्सव 10 दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. याशिवाय तुम्ही गणपतीची मूर्ती दीड दिवस ते तीन, पाच, सात आणि दहा दिवसही घरात बसवून विसर्जन करू शकता. पण, काहीही असो, श्रद्धा ही मनातून असली पाहिजे आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद सर्वांच्याच पाठिशी सदैव असतात. 


 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT