Badlapur : 'DCP चा फोन आला, FIR बदललं...ते प्रकरण दाबण्यासाठी...' कुटुंबीयांनी सांगितली Inside Story
Badlapur News Case Update : आजतक, इंडिया टुडेने बदलापूर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांशी बातचीत केली आहे. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या घटनेनंतर ''आम्ही पोलिसांवरील विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही'',अशी खंत शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आम्ही पोलिसांवरील विश्वासार्हता गमावली
पोलिसांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही
पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केली खंत
Badlapur News Case Update Exclusive : बदलापूरमधील चिमुरडींवर (Badlapue Assualt Case) झालेल्या अत्याचाराचे प्रकरण दाबण्यासाठी अनेक प्रयत्न झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शाळेपासून ते पोलीसांपर्यंत सगळ्यांनीच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे नेमकं शाळा प्रशासनाने (School Administration) आणि पोलिसांनी (Police) हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय केलं? यामागची इनसाईड स्टोरी पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितली आहे. (badlapur rape case upate school administration and police try to hide these case exclusive news read full article)
आजतक, इंडिया टुडेने बदलापूर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांशी बातचीत केली आहे. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या घटनेनंतर ''आम्ही पोलिसांवरील विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही'',अशी खंत शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
शाळा प्रशासनाचा अजब दावा
चिमुरडींचे वैद्यकीय अहवाल हाती आल्यानंतर त्यात अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी घटनेचा जाब विचारण्यासाठी शाळा गाठली होती. मात्र आमच्या शाळेत ही घटना घडूच शकत नाही, असे म्हणत शाळा प्रशासनाने घटनेस नकार दिला. तसेच ही घटना शाळेत नसून शाळेबाहेर घडल्याचे सांगितले किंवा सायकल चालवताना घडले असल्याचाही दावा केला होता. पण पीडितेच्या कुटुंबीयांनी यावेळी आमच्याकडे वैद्यकीय अहवाल आहे आणि सायकल चालवताना असे घडू शकत नाही, असे म्हणत शाळा प्रशासनाचा दावा फेटाळून लावला होता.
हे ही वाचा : Badlapur School Case: 'हे सगळं...', आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा खळबळजनक आरोप
शाळेच्या सीसीटीव्हीत बिघाड
दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्हीची मागणी देखील केली होती. मात्र शाळा प्रशासनाने सीसीटीव्हीचे कामकाज सूरू असल्याने ते 15 दिवसांपासून बंद असल्याचे कारण दिल्याचे पीडितेचे कुटूंबीय म्हणाले. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे पुरूष स्टाफ का ठेवला? याचा जाब देखील विचारला होता. त्यामुळे अशा प्रकारची माहिती देऊन शाळा प्रशासनाने प्रकरण दाबल्याचा आरोप करत
मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांवरही कारवाईची मागणी केली आहे.










