Badlapur School Case: 'हे सगळं...', आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा खळबळजनक आरोप
Badlapur News: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना एक खळबळजनक आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी माहिती
आरोपी अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया आली समोर
अक्षयला फसवलं जात असल्याचा आरोपीच्या आई-वडिलांनी केला दावा
Badlapur school news: बदलापूर: बदलापूरमधील शाळेतील चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. मात्र, आता याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी असा दावा केला आहे की, 'आपल्या मुलाला फसविण्यात येत असून हे सगळं खोटं आहे.' याबाबत आरोपी अक्षय शिंदेचे आई-वडील नेमकं काय म्हणाले हे सविस्तरपणे जाणून घेऊया. (badlapur school case its all a lie akshay is being cheated accused akshay shinde parents sensationally allege)
ADVERTISEMENT
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या नागरिकांचा जो उद्रेक झाला त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं. शाळेत सफाई कर्मचारी असलेला अक्षय शिंदे याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काल (21 ऑगस्ट) रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक काही जणांनी अक्षय शिंदेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. तसंच त्याच्या कुटुंबातील लोकांनाही मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हे ही वाचा>> Badlapur: नराधम अक्षय शिंदेबद्दल शेजाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती, नेमकं काय सांगितलं?
दरम्यान, आत या सगळ्या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला फोनवरून आरोपी अक्षयच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलं का?
'आमच्या अक्षयला फसवलं जातंय', आई-वडिलांचा दावा
अक्षयचे आई-वडील म्हणाले की, 'हे सगळं खोटं आहे अक्षयला कामाला लागून फक्त 15 दिवस झाले होते. अशी घटना घडली आहे हे आम्हाला 13 तारखेला कळलं आणि 17 तारखेला अक्षयला पोलीस धरून घेऊन गेले. आम्हाला काहीच नाही सांगितलं. जी तिथे काम करणारी बाई होती तिने आम्हाला सांगितलं की, अक्षयला धरून नेलं.'
'पोलिसांनी अक्षयला मारहाण केली. माझ्या लहान मुलालाही पोलिसांनी मारलं. चौकीत गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की, तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे. पण आमच्या अक्षयला फसवलं जातंय.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Badlapur News: '2000 रुपये आमच्याकडून घ्या, तुमची लाडकी बहीण योजना नको...' शिंदे सरकारवर बदलापूरकर संतापले!
'अक्षयला शाळेत फक्त बाथरूम धुवण्याचं काम होतं. अक्षय फक्त 11 वाजता बाथरुम धुवायला जात होता. बाकी कुठलंही काम दिलेलं नव्हतं. त्यानंतर शाळेत झाडू मारायचा. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की आम्ही झाडू मारायला जायचो. आमचं सगळं कुटुंबच हाऊसकिपिंगचं काम करतं. आमचं सगळं कुटुंबच शाळेत कामाला आहे.'
ADVERTISEMENT
अक्षय गतिमंद आहे का?
या प्रश्नावर बोलताना अक्षयची आई म्हणाली की, 'नाही तेवढा नाही आहे.. लहानपणी त्याला थोडं दुखणं होतं, डोक्याने थोडा कमजोर होता. पण त्याला औषधोपचार सुरु होते.'
घरात तोडफोड झाली त्यावेळेस तुम्ही तिथे होता नेमकं काय घडलं?
यावर अक्षयचे वडील म्हणाले, 'डायरेक्ट पब्लिक घरात आलं, लहान मुलापासून, मोठ्या माणसांपर्यंत आम्हा सर्वांना मारून, मारून घराबाहेर फेकलं. आम्हाला काहीच बोलून दिलं नाही. आम्हाला सांगितलं की, तुम्ही राहायचंच नाही इथे.. तुम्ही असं केलंय ना तर तुम्ही राहायचं नाही.' असं म्हणत आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT