Covid-19 JN.1 strain: धडकी भरवणारी बातमी… महाराष्ट्रासह 3 राज्यात सापडले Corona रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

goa kerala and maharashtra corona sub variant jn 1 spread in 3 states of country 21 cases reported
goa kerala and maharashtra corona sub variant jn 1 spread in 3 states of country 21 cases reported
social share
google news

COVID 19 Sub Variant JN.1 Live News: मुंबई: देशभरात कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढत आहे. आत्तापर्यंत, कोविड-19 चा सब-व्हेरिएंट JN.1 ची आतापर्यंत 21 प्रकरणं समोर आली आहेत. गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात नवीन कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत एकट्या गोव्यात या व्हेरिएंटचे 19 रुग्ण सापडले आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. (goa kerala and maharashtra corona sub variant jn 1 spread in 3 states of country 21 cases reportedc)

ADVERTISEMENT

दक्षता घेण्याच्या सूचना

कोरोनाच्या Omicron प्रकाराचाच सब व्हेरिएंट JN.1 हा गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगाने पसरणाऱ्या विषाणूंपैकी एक बनला आहे. देशभरात वाढत्या कोविड प्रकरणांमध्ये, NITI आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी बुधवारी सांगितले की, घाबरण्याची गरज नाही. पॉल म्हणाले की, भारतातील शास्त्रज्ञ नवीन व्हेरिएंटवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तथापि, व्हीके पॉल यांनी राज्यांनी कोविड सज्जता वाढवणे, चाचणी वाढवणे आणि त्यांची पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करणे यावर भर दिला.

हे ही वाचा>> ‘कालपर्यंत जो मुलगा माझ्यासाठी रडायचा त्याने…’ Priya Singh ने अश्वजीतबद्दल काय सांगितलं?

दरम्यान, देशभरात कोविडची प्रकरणे वाढत असल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. अॅडव्हायझरीमध्ये, राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, इन्फ्लूएंझासारखा आजार आणि तीव्र पसरणाऱ्या श्वसन रोगाच्या प्रकरणांवर, जिल्हावार, सर्व आरोग्य सुविधांमध्ये नियमितपणे निरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

ऑगस्टमध्ये लक्समबर्गमध्ये आढळला होता पहिला रुग्ण

कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 बद्दल असे समोर आले आहे की, ऑगस्टमध्ये लक्झेंबर्गमध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर तो हळूहळू 36 ते 40 देशांमध्ये पसरला. डब्ल्यूएचओने याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हटले आहे. कोविडमुळे गेल्या दोन आठवड्यात देशात 16 मृत्यू झाले आहेत. या लोकांना आधीच अनेक गंभीर आजार होते. म्हणजे हे लोक सहव्याधीने ग्रस्त होते. अलीकडेच, 15 डिसेंबर रोजी बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात एका व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यांना इतर अनेक आजारांनी ग्रासले होते. या रुग्णाचे नमुने गोळा करून जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

केरळमध्ये 614 नवीन रुग्ण, 3 मृत्यू

काल भारतात कोरोना संसर्गाची 614 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी 21 मे नंतरची सर्वाधिक आहे. बुधवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या 2,311 वर पोहोचली आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर देशात कोविडमुळे मृतांचा आकडा 5 लाख 33 हजार 321 वर पोहोचला आहे. आत्तापर्यंत भारतात कोरोनाचे 4.50 कोटी रुग्ण आढळले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> धक्कादायक ! 7 महिन्यात 4 हजार 872 नवजात बालकं दगावली, दररोजचा आकडा तर…

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट झपाट्याने पसरतो

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 स्ट्रेनबद्दल म्हटले आहे की, तपासणीत असे दिसून आले आहे की, तो इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक सहजपणे पसरतो. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे विषाणूशास्त्रज्ञ अँड्र्यू पेकोस यांनी म्हटले आहे की, जेएन.1 ला फारसा धोका नाही. JN.1 पूर्वी त्याच्या मूळ वंशाच्या BA.2.86 चा भाग म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते, परंतु WHO ने आता त्याचे वेगळे रूप म्हणून वर्गीकरण केले आहे. WHO म्हणते की, सध्याच्या लसी JN.1 आणि COVID-19 विषाणूच्या इतर प्रकारांमुळे होणारे गंभीर रोग आणि मृत्यू रोखण्यासाठी कामी येतील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT