Gold Price: सणासुदीत सोनं झालं प्रचंड महाग! पाहिलेत का आजच्या किंमतीतील 'हे' मोठे बदल?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

point

सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी

point

सोने-चांदीचे भाव कितीने वाढले?

Gold-Silver Price hike : महाराष्ट्रात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज, गुरुवार 26 सप्टेंबर 2024 रोजी, राज्यभरात सोन्याचे दर सर्वकालीन उच्चांक गाठत आहेत. सणासुदींच्या दिवसांत सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी घेतली आहे. सोनं पहिल्यांदाच चक्क 76 हजारांच्या वर गेलं आहे. अशातच आता ग्राहकांच्या खिशाला कात्री बसरणार आहे. त्यामुळे आजचे (26 सप्टेंबर) सोने-चांदीचे भाव कितीने वाढले सविस्तर जाणून घेऊया. (Gold-Silver Price hike today 26 september 2024 in maharashtra mumbai Pune what are the rates)

ADVERTISEMENT

Goodreturns वेबसाईटनुसार, आज सोन्याच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाही आहेत. पण हे दर प्रचंड महाग आहेत. काल म्हणजेच बुधवारी 26 सप्टेंबर 2024 रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,020 रूपये होता. हाच भाव आजही कायम आहे. यामध्ये बदल झालेला नाही आहे. तर, 22 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 70,600 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 95,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Maharashtra Breaking News : संजय राऊतांना मोठा झटका! तुरूंगात जावं लागणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनेाच्या दरात वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रातील बाजारावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. विशेष म्हणजे पितृपक्ष सुरू असल्याने सोने खरेदीला काहीशी मंदी येण्याची शक्यता होती, मात्र या उलट सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.

हे वाचलं का?

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे गेला आहे.

हेही वाचा : Bengaluru Murder Case:घरात ट्रॉली बॅग, सापडले 59 तुकडे! CCTV मधून मिळाला मोठा पुरावा, असं उलगडतंय महालक्ष्मीच्या हत्येचं गूढ...

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,020 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,770 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,020 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,770 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,020 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,770 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,630 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,050 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,800 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT