Govt Jobs 2024: गडचिरोली आरोग्य विभागात नोकरीची संधी! अशी आहे अर्ज प्रक्रिया...
Jobs in General Hospital Gadchiroli : परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, सामान्य रूग्णालय, गडचिरोली अंतर्गत सध्या विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, सामान्य रूग्णालय, गडचिरोली अंतर्गत सध्या विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया
नोकरीचे ठिकाण गडचिरोली आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया काय?
Jobs in General Hospital Gadchiroli : परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, सामान्य रूग्णालय, गडचिरोली अंतर्गत सध्या विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहेत. एएनएम, जीएनएम अशा दोन पदांसाठी एकूण 41 जागांवर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण गडचिरोली आहे. (Govt Jobs Opportunity 2024 in Gadchiroli Health Department Here is the application process)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- प्रवेश प्रक्रियेसाठी कोणताही मुद्दा उपस्थित झाल्यास सक्षम प्राधिकारी (आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई) अंतिम निर्णय घेतील व तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील.
- आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई यांच्या अंतिम मान्यतेनंतर प्रवेश देण्यात येईल.
- शैक्षणिक अर्हताप्राप्त अशा उमेदवारांची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
- आशा उमेदवारांची सलग तीन वर्षे सेवा होणे आवश्यक आहे.
- जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मागील ३ वर्षाचे एकत्रित मानधन पत्र जोडणे आवश्यक राहील.
- जीएनएमकरिता एएनएम आरक्षणाबाबतची निवड शैक्षणिक अर्हताप्राप्त एएनएमच्या गुणवतेनुसार करण्यात येईल.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! फॉर्म भरलाय पण पैसेच आले नाहीत? ही आहेत कारणं...
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- एएनएम या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 400 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- एएनएम राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
- जीएनएम खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जात आहेत.
- तर, जीएनएम राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून 250 रूपये अर्ज शुल्क आकारण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी परिचारिका प्रशिक्षण विद्यालय सामान्य रुग्णालय, गडचिरोलीच्या अधिकृत वेबसाइट https://gadchiroli.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
हे वाचलं का?
हेही वाचा : Bigg Boss 18 : डंके की चोट पे...गुणरत्न सदावर्ते पुन्हा बिग बॉसमध्ये परतणार?
अर्जाची लिंक
उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीमध्ये इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच पोस्टाने किंवा स्वतः उपस्थित राहून सादर करायचे आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT