गरबा खेळायला गेला अन् घडला अनर्थ, 26 वर्षीय तरूण जागेवरच गेला!
नवरात्री सुरू होण्यापूर्वी गरबा सरावावेळी हृदयविकाराच्या झटक्याच्या घटना गुजरातमधून समोर आल्या होत्या. आताही गुजरातमधील सुरत शहरातील असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे गरबा खेळत असताना 26 वर्षीय शेतकरी तरुणाला हृदयविकाराचा झटका आला.
ADVERTISEMENT
Gujarat Crime News : नवरात्री सुरू होण्यापूर्वी गरबा सरावावेळी हृदयविकाराच्या झटक्याच्या घटना गुजरातमधून समोर आल्या होत्या. नवरात्रीतही गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. आताही गुजरातमधील सुरत शहरातील असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे गरबा खेळत असताना 26 वर्षीय शेतकरी तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. गरबा पंडालमध्ये चक्कर आल्याने तो खाली पडला कुटुंबीयांनी तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेत बसवून उपचारासाठी रुग्णालयात नेले, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Gujarat News While Playing Garba a 26 years Old youth Dies of Heart Attack)
ADVERTISEMENT
Ajit Pawar: ‘एकदा होऊनच जाऊ द्या…’, अजित पवारांची प्रचंड मोठी मागणी, भाजपलाच गाठलं खिंडीत?
गरबा पंडालमध्ये तरूणाचा धक्कादायक मृत्यू
सूरत शहराजवळील बोनंद गावातील डुंगरी परिसरात राहणाऱ्या रोहित राठोडचा मृत्यू झाला. रविवारी (22 ऑक्टोबर) रात्री रोहित त्याच्या घरासमोर उभारलेल्या गरबा पंडालमध्ये गावकऱ्यांसोबत गरबा खेळत होता. गरबा खेळताना रोहित गरबा पंडालमध्येच पडला होता. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ पलसाणा परिसरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे उपस्थित डॉक्टरांनी रोहित राठोडला मृत घोषित केले.
महिलेला विवस्त्र करून मारहाण : पत्नीवर गुन्हा दाखल होताच सुरेश धसांची मोठी मागणी
खेळत असताना अचानक जागेवरच कोसळला
डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच रोहितच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत रोहित राठोडचा मोठा भाऊ प्रवीण राठोड यांनी सांगितले की, अष्टमीची नवरात्र होती आणि गावातील सर्वजण गरबा खेळत होते. रोहित भाई पण खेळत होता. खेळता खेळता तो अचानक खाली कोसळला. त्याला उपचारासाठी पलसाणा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. रोहितला कोणताही आजार नव्हता. त्याचं लग्नही झालं असून त्याला एक मुलगी आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT