‘गांधींची हत्या, नथुरामजी…’, गुणरत्न सदावर्तेंच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांना कोणी देशद्रोही म्हणू शकत नाही. मी गांधींचे विचार कधी मानले नाही आणि मानणारही नाही. असं वादग्रस्त विधान गुणरत्न सदावर्तेंनी केलं आहे.
ADVERTISEMENT
Gunaratna Sasdavarte: मनीष जोग, जळगाव: ‘महात्मा गांधीजींची (Mahatam Gandhi) हत्या करणाऱ्या नथुरामजींना कोणी देशद्रोही म्हणू शकत नाही. नथुरामने कधीच देशाचे तुकडे करा असं म्हटलं नाही. आई भवानीची शपथ मी बॅरिस्टर गांधीजीचे विचार कधी मानले नाहीत आणि मानणारही नाही.’ असे खळबळजनक विधान गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. (gunaratna sadavarte controversial statement mahatma gandhi murder nathuram godse not a traitor)
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते
‘पुणे कराराबाबतदेखील महात्मा गांधींची भूमिका योग्य नव्हती.’ असंही सदावर्ते यावेळी म्हणाले. ‘नथुराम गोडसे हे संघटित भारतासाठी मोठे होते आणि राहतील.’ असं म्हणत सदावर्तेंनी गोडसेंचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. एसटी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी ते जळगाव आगारात आले होते. यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते भडकले. तसेच शरद पवार नावाच्या व्हायरस विचारांना संपविण्याची गरज आहे. असंही वादग्रस्त विधान यावेळी सदावर्तेंनी केलं आहे.
हे ही वाचा >> Gita Press Gorakhpur : गांधी शांती पुरस्काराची रक्कम गीता प्रेसने का नाकारली, समजून घ्या वाद
गुणवंत सदावर्ते हे एसटी सहकारी बँकेच्या सदावर्ते पॅनलच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगावात आले होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांचे हत्या करणारे नथुराम गोडसे यांचा समर्थन केलं. नथुरामजी असा उल्लेख करत ते देशद्रोही नव्हते असंही यावेळी सदावर्ते म्हणाले.
हे वाचलं का?
गुणरत्न सदावर्तेंची सनद रद्द
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद रद्द झाली आहे. अॅड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीनंतर बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रने ही कारवाई केली आहे. याबाबत बार काऊंसिल ऑफ इंडियालाही पत्राद्वारे कळविण्यात आलं आहे. या कारवाईनंतर आता सदावर्ते यांना देशातील कोणत्याही न्यायालयात पुढील 2 वर्ष वकिली करता येणार नाही.
अॅड. सुशील मंचरकर यांनी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. यात सदावर्ते यांच्यावर पेशाने वकील असतानाही सामाजिक पातळीवर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. एसटी आंदोलनात वकिलांचा ड्रेस परिधान करून सहभाग घेणं, पाठिंबा देणं, बैठका घेणं अशा बार काऊंसिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने सदावर्ते यांना नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती. मात्र ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित आहे, असा दावा करत या कारवाईविरोधात सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Shinde vs Thackeray: शिवसेनेचे दोन तुकडे अन् 12 महिन्यांची कहाणी… कोण आहे आज बाहुबली?
सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. यावेळी त्यांनी बार कौन्सिलवर आरोपांचा पाढा वाचला. त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने सदावर्तेंना जोरदार शब्दात फटकारलं होतं. तुमच्याविरोधातील तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला म्हणून तुम्हाला विशेष वागणूक देणार नाही. प्रथमदर्शनी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या नोटिशीमध्ये काही चुकीचे दिसून येत नाही. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला बार कौन्सिलविरोधात चुकीचा प्रचार करू देणार नाही, असं खंडपीठाने सदावर्ते यांना बजावलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT