'मी बायकोचा मोबाइल पाहिला, त्यात..' पत्नीचं डर्टी सीक्रेट समजताच अन् पतीचं भयंकर कृत्य

मुंबई तक

Married Woman Shocking Viral News :  मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

पती-पत्नीमध्ये वाद झाला. (प्रतिमा स्रोत: मेटा एआय)
पती-पत्नीमध्ये वाद झाला. (प्रतिमा स्रोत: मेटा एआय)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दीक्षा प्रियकरासोबत बोलायची अन् नंतर घडलं..

point

पतीन राहत्या घरी स्वत:चं जीवन संपवलं..

point

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?

Married Woman Shocking Viral News :  मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. एक व्यक्तीने व्हाट्सअॅपवर स्टेटस ठेऊन राहत्या घरात गळफास घेतला. स्टेटसमध्ये मृताने पत्नी, सासू, मेव्हणीवर छळ केल्याचा आरोप लावला आहे. स्टेटसमध्ये लिहिलं की, माझ्या मृत्यूसाठी हेच लोक जबाबदार असणार आहेत. याआधी 17 एप्रिललाही पतीने पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.

पण त्यावेळी त्याचा जीव वाचला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आलीय. जबलपूर शहराच्या घमापूरमध्ये राहणाऱ्या 32 वर्षांच्या मंयक शर्माचं लग्न दीक्षा शर्मासोबत 2017 मध्ये झालं होतं. लग्नाच्या काही वर्षापर्यंत कुटुंबात सर्वकाही ठीक होतं. दोघांना दोन मुली आहेत. एक मुलगी 6 वर्षाची असून दुसरी मुलगी 3 वर्षांची आहे. मयंक चहाचं दुकान चालवायचा..

हे ही वाचा >> काय सांगता! सोन्याचे दर पुन्हा कडाडले; तुमच्या शहरातील 24 कॅरेेट सोन्याचा भाव वाचून टेन्शनच वाढेल

दीक्षा प्रियकरासोबत बोलायची अन् नंतर घडलं..

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा दुसऱ्या तरुणासोबत फोनवर बोलायची. संजय साहू असं या व्यक्तीचं नाव आहे. या विवाहबाह्य संबंधामुळे पती-पत्नीत नेहमीच वाद व्हायचे. या वादविवादामुळे पत्नी दीक्षा घर सोडून गेली होती. त्यानंतर 15 एप्रिलला पती मयंकविरोधात तिलवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयंकला समजलं होतं की, त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर तो नैराश्यात गेला आणि 17 एप्रिलला विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण घरच्यांनी वेळीच त्याला रुग्णालयात नेलं. त्यामुळे त्याचा जीव वाचला.

हे ही वाचा >> काय सांगता! सोन्याचे दर पुन्हा कडाडले; तुमच्या शहरातील 24 कॅरेेट सोन्याचा भाव वाचून टेन्शनच वाढेल

मयंकला माहित झालं होतं की, त्याची पत्नी दीक्षाचं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरु आहेत. दीक्षा नेहमीच तिच्या प्रियकरासोबत बोलायची, अशी माहिती कुटुंबियांनी मयंकला दिली होती. त्यानंतर मयंकने पत्नीला सुनावलं आणि प्रियकराशी संबंध न ठेवण्यासाठी सांगितलं. त्यामुळे दीक्षा नाराज झाली आणि माहेरी निघून गेली. त्यानंतर दीक्षाने मयंकला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यादरम्यान, दोन्ही मुली मयंकसोबत राहत होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp