Maratha Morcha : मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा; म्हणाले, ‘उद्यापासून…’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Morcha : manoj jarange who agitated for maratha reservation warns eknath shinde government
Maratha Morcha : manoj jarange who agitated for maratha reservation warns eknath shinde government
social share
google news

Manoj Jarange Maratha Reservation News : मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त परिषद घेतली. सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर असल्याचे तिघांनी सांगितले. पण, आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. सरकारचा अध्यादेश आला नाही, तर पाणी पिणंही सोडणार असा इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

पत्रकार परिषदेनंतर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “मी जे ऐकलं त्यात ज्या मागण्या आहेत. त्यातील एकही मागणी आतापर्यंत अंमलबजावणीला गेलेली नाही. मंजूरी आणि प्रोसेसिंगला तो विषय आलेला आहे. कारण त्या प्रक्रियेत मी स्वतः आहे. पाच सात मुद्दे माझ्या लक्षात आले, त्यांचे अधिकृत लोक येतील, तोपर्यंत संशय घ्यायला नको”, असं त्यांनी सांगितले.

बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ नकोय

“आपलं म्हणणं ऐकून गेले आहेत. पण, एकूण लक्षात येतंय की निर्णय काय आहे. आरक्षणाबाबतचा निर्णय झालेला नसावा. मला असं वाटतं की, त्यांचे लोक येईपर्यंत वाट बघितली तर बरं होईल. त्यांच्या लोकांनी यावे, पण त्यांनी येताना मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. विनाकारण बैठकांचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुऱ्हाळ हे आता जी पिढी आरक्षणासाठी लढतेय, त्यांना हे नकोय”, असे खडेबोल मनोज जरांगे यांनी सरकारला सुनावले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Manoj Jarange : समाजासाठी विकली जमीन, हॉटेलात केलं काम; कोण आहेत मनोज जरांगे?

“चर्चा करायला हरकत नाही. चर्चेशिवाय मार्ग सुटणार नाही. याचा अर्थ असाही नाही की, तुम्ही पहिलेच पाढे प्रत्येक वेळी वाचत बसणार. पंरतु सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले असतील, तर त्यांचे लोक येऊन सांगतील. सरकारने आरक्षण जाहीर केलं की नाही, पण त्यांचं शिष्टमंडळ निर्णय घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे.”

हेही वाचा >> Ajit Pawar : “सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारमधून बाहेर पडा”, घोषणांनी बारामती दणणाली

“आम्ही सरकारच्या शिष्टमंडळाची वाट बघतोय. ते आरक्षणाचं पत्रच घेऊन येतील. आम्ही देवासारखी वाट बघतोय. ते येऊन आमच्याकडे मराठा आरक्षणाचा अध्यादेश देतील आणि मग पुढे आंदोलनाचं बघुयात. शासन आदेश आला नाही, तर आंदोलन अजिबात थांबणार नाही. पंरतु उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा”, असा इशारा जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

लाठीमाराबद्दल फडणवीसांनी सरकारच्यावतीने माफी मागितली. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. तेवढी का होईना माणुसकी दाखवण्याचे काम केले. या महाराष्ट्राचे मायबाप तुम्ही आहात. तुमच्याच आईला, लेकरांना खूप मारलंय. त्यांना कायमचं बडतर्फ करा, सक्तीच्या रजेवर पाठवू नका. जे गुन्हे दाखल केले आहेत, आम्ही मर्डर करणारे लोक नाही. आम्ही दहशतवाद्याची छावणी इथे नाहीये. आमची ती जमात नाहीये. ते गुन्हे मागे घ्या”, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT