#BoycottMaldives ट्रेंडनं मालदीवचे बुकिंग धडाधड रद्द, पर्यटनाची लागली वाट

मुंबई तक

ADVERTISEMENT

India Boycott Maldives Trend Impacts Tourism As Maldivian Ministers Criticize PM Narendra Modi
India Boycott Maldives Trend Impacts Tourism As Maldivian Ministers Criticize PM Narendra Modi
social share
google news

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याची छायाचित्रं (Lakshadweep tour) प्रचंड व्हायरल (Viral Photo) झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांनी या भारतीय स्थळाला भेट देण्याचे आवाहनही केले. मात्र त्यांच्या त्या आवहनानंतर  मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेमुळे तोच मुद्दा प्रचंड चर्चेत आला. त्यानंतर तेथील सरकारनेही टिप्पणी करणाऱ्या त्या तीन मंत्र्यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले. मात्र तरीही भारतीयांचा संताप अजून कमी झालेला दिसून येत नाही.

ADVERTISEMENT

#BoycottMaldives ट्रेंड:

या सगळ्याचा परिणाम आता देशाच्या जीडीपीमध्ये मोठा वाटा असलेल्या मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर सर्वाधिक दिसून येत आहे. या घटनेमुळे #BoycottMaldives हा ट्रेंड भारतात सुरू झाला आहे. भारताती पर्यटकांनी मालदीवला जाण्यास नकार दिल्यामुळे आता मालदीवला जाणाऱ्या विमानांची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत असलेल्या कंपन्या आता लक्षद्वीपला भेट देण्यासाठी बंपर सूट देत आहेत.बायकॉट मालदीव मालदीव या ट्रेंडमुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे.  या ट्रेंडमुळेच भारतातील पर्यंटकांनी आपली ट्रीप रद्द केली आहे. त्याचा फटका विमान कंपन्यांना बसला आहे.

व्यापाऱ्यावर गंभीर परिणाम

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर त्यांच्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका टीप्पणी केली होती. त्याचा थेट परिणाम मालदीच्या पर्यटनावर झाल्याचे दिसून येत आहे. तर सोशल मीडियावर आता बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम मालदीवच्या व्यापार व्यवस्थेवर झाला आहे. या बॉयकॉट मालदीव ट्रेंडमुळे आता भारतीय टूर आणि ट्रॅव्हल्सकडून असा दावा करण्यात येते आहे की, मालदीव बाबत आता कोणतीही चौकशी करण्यात येत नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये घुसखोरी, ‘ते’ दोघं नेमके कोण?

 प्री-बुकिंग रद्द

बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरु झाल्यानंतर आता भारतातील अनेक पर्यटकांनी मालदीवचे केलेले प्री-बुकिंग रद्द केले आहे. ते रद्द केल्याचे काही फोटोही आता शेअर करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीका टीप्पणीवरूनही मालदीवर सोशल मीडियावरून प्रचंड टीका केली जात आहे. याबाबत डॉ. फलक जोशीपुरा यांनी आपले बुकिंग रद्द करताना सांगितले की, माझ्या वाढदिवसाला मी मालदीवला जाण्याचा प्लॅन केला होता, मात्र तो रद्द केला आहे. तर अक्षित सिंग या युजरनेही 31 मार्च ते 2 एप्रिल पर्यंतची ट्रीप रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम

पर्यटनावर अवलंबून असलेल्या मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर भारताने बहिष्कार टाकल्याने त्याचा वाईट परिणाम होत आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपनीकडून मालदीवसाठी करण्यात आलेले सर्व बुकिंग एकाच वेळी रद्द केले आहे.  ईजी माय ट्रीपचे प्रशांत पिट्टी यांनी सांगितले आहे की, आमची कंपनी पूर्णपणे घरगुती आणि भारतातील आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीप्पणीवरूनच हा आम्ही निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आम्ही यापुढेही मालदीवचे कोणतेही बुकिंग आम्ही घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यापुढं जाऊन त्यांनी हे ही सांगितले की, अयोध्या आणि लक्षद्वीप या ठिकाणांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sanjay Raut : न्यायमूर्ती आरोपीकडे चहा प्यायला लागले तर…’, राऊतांकडून नार्वेकरांवर झोंबणारी टीका

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT