Jio Bharat: रिलायन्स जिओचा धमाका, 999 रूपयात 4G फोन लॉंच

मुंबई तक

ADVERTISEMENT

jio launches rs 999 4g phone jio bharat v2 specs feature and plan
jio launches rs 999 4g phone jio bharat v2 specs feature and plan
social share
google news

रिलायन्स जिओने सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वांत स्वस्त 4G फोन लॉंच केला आहे. जिओने लॉंच केलेल्या या फोनचे नाव जिओ भारत असून याची किंमत फक्त 999 रूपये आहे. कंपनीने 2G मुक्त भारत अंतर्गत हा फोन भारतात लॉंच केला आहे.या फोनमध्ये जिओने अनेक सुविधा दिल्या आहेत.याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. (jio launches rs 999 4g phone jio bharat v2 specs feature and plan)

रिलायन्स जिओने लॉंच केलेल्या जिओ भारत V2 या फोनमध्ये ग्राहकांना कॅमेरा, अनलिमिटेड कॉल्स आणि युपीआय पेमेंट सारख्या अनेक सुविधा दिल्या आहेत. यासोबत ग्राहकांना जिओ सिनेमा, जिओ सावन, एफएम रेडीओ सारख्या अनेक एंटरटेनमेंट सुविधा मिळणार आहे. हा 4G फोन इतक्या स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

रिलायन्स जिओने लॉंच केलेला हा बेसीक फिचर फोन आहे. रिलायन्स जिओने भारतीय हँडसेट निर्माता कार्बन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या 4G फोनसोबत ग्राहकांना जिओचा प्लॅन देखील घ्यावा लागणार आहे. या प्लानची सुरुवात 123 रूपयापासून होणार आहे.यामध्ये ग्राहाकांना अनलिमिटेड वॉईस कॉल आणि 14जीबी डेटा मिळणार आहे. वर्षासाठी जर ग्राहकांना प्लॅन घ्यायचा असल्यास ग्राहकांना 1234 रूपये भरावे लागणार आहेत.यामध्ये त्यांना 168 जीबी डेटा मिळणार आहे. इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त प्लान रिलायन्स जिओ देत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Jio Bharat फोनमध्ये 4.5 सेमी टीएफटी डिस्प्ले दिला गेला आहे. या फोनची बॅटरी 1,000mAh ची आहे. या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सल्सचा रिअर कॅमेरा आहे. कंपनीने यात फ्लॅश देखील दिला आहे जो टॉर्च म्हणून वापरता येईल. या फोनमध्ये 128GB पर्यंतचे SD कार्ड इंस्टॉल केले जाऊ शकते. या फोनचे वजन 71 ग्रॅम आहे. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे.विशेष म्हणजे जिओ भारत फोनमध्ये UPI पेमेंटची सुविधा देखील देण्यात आली आहे. परंतु ती फक्त JioPay साठीच असेल.

भारतातील साधारण 250 मिलियन असे मोबाईल युझर्स आहेत, जे अजूनही 2G मध्ये अडकून पडले आहेत. जग 5Gच्या दिशेने जात असताना या नागरीकांच्या फोनमध्ये इंटरनेट सुविधा नाही आहेत. त्यामुळे अशा नागरीकांसाठी रिलायन्स जिओने जिओ भारत हा 4G फोन लॉंच केल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT