भर दुपारी 15 गोळ्या झाडल्या अन् 3 किलो सोनं पळवलं, दरोड्याने कोल्हापूर हादरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

kolhapur crime news 3 kg gold stolen firing gun robbery robber
kolhapur crime news 3 kg gold stolen firing gun robbery robber
social share
google news

Crime News: दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बालिंगा गावात भरदिवसा मोठा सशस्त्र दरोडा (Robbery) पडल्याची घटना घडली. तब्बल 3 किलो सोन्याचे दागिने आणि रोख 2 लाख रूपये त्यांनी लुटून नेले. यावेळी दुकान मालकानं दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी अंदाधुंद गोळीबार (Firing) केला. त्यामध्ये दुकानमालक रमेश शंकर माळी आणि त्यांचे सहकारी जितू मोराजी माळी हे दोघेजण जखमी झाले. दरोडेखोरांनी सुमारे 15 गोळ्या झाडल्या. त्यामुळं बालिंगा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (kolhapur crime news 3 kg gold stolen firing gun robbery robber)

ADVERTISEMENT

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेवून तपासाची सूत्रं हाती घेतली. मात्र, या घटनेने व्यापारी वर्गात चांगलीच धडकी भरली आहे.

नेमकं काय घडलं?

एखाद्या चित्रपटात शोभावी, अशी दरोड्याची घटना आज कोल्हापूर जवळच्या बालिंगा गावात घडली. दोन दुचाकीवरून आलेल्या चौघा दरोडेखोरांनी, दुपारी दोनच्या सुमारास बालिंग्यातील कात्यायनी ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. या दरोडेखोरांकडं रिव्हॉल्वर होतं. त्याचा धाक दाखवून, या दरोडेखोरांनी ज्वेलरी शॉप मधील तब्बल 3 किलो सोन्याचे दागिने आणि रोख 2 लाख रूपये, असा एकूण 1 कोटी 82 लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!

त्यावेळी दुकानमालक 40 वर्षाचे रमेश शंकर माळी आणि त्यांचे सहकारी जितू मोराजी माळी यांनी दरोडेखोरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत, दरोडेखोरांनी गोळीबार केला. दुकानात सात गोळ्या झाडून दरोडेखोरांनी रमेश आणि जितू माळी यांना जखमी केलं. त्यानंतर दुकानाबाहेर पडतानाही दरोडेखोरांनी हवेत गोळ्या झाडल्या. सोने आणि रोख रक्कम घेऊन, हे चौघे दरोडेखोर दुचाकीवरूनच पसार झाले.

गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक धावत आले. मात्र दरोडेखोरांनी ग्रामस्थांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत, जवळ येण्यास मज्जाव केला. त्यावेळी काही ग्रामस्थांनी दुचाकीवरून पळून जात असलेल्या दरोडेखोरांचा पाठलाग करत, त्यांच्या दिशेनं दगड भिरकावले. मात्र दरोडेखोरांनी पुन्हा हवेत गोळीबार करत, ग्रामस्थांवर पिस्तुल रोखलं. त्यामुळं ग्रामस्थांनी पाठलाग करणं सोडून दिलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mira Road: ‘मी वेब सीरिजमध्ये पाहिलं होतं…’ मनोज सानेच्या शेजाऱ्याचा हादरवून टाकणारा खुलासा

भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळं बालिंगा ग्रामस्थ सुध्दा हादरून गेले. बघता-बघता या दरोड्याची माहिती पसरली आणि कात्यायनी ज्वेलर्सच्या दारात प्रचंड गर्दी जमली. त्यामुळं कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच, करवीरचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे, यांच्यासह पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी तातडीनं बालिंग्यात आले.

ADVERTISEMENT

पोलिसांनी सारा परिसर जणू सील केला आणि या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. भर दिवसा कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जखमी रमेश आणि जितू माळी यांना एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून, त्यापैकी एकजण अत्यवस्थ आहे. तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या दरोड्याचा तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप तरी दरोडेखोरांविषयी फारशी काही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT