Mira Road: ‘मी वेब सीरिजमध्ये पाहिलं होतं…’ मनोज सानेच्या शेजाऱ्याचा हादरवून टाकणारा खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mira road manoj sane live in partner saraswati vaidya murder case neighbour cooker mumbai crime news
mira road manoj sane live in partner saraswati vaidya murder case neighbour cooker mumbai crime news
social share
google news

Mumbai Crime News: मुंबई: मुंबई जवळच्या मीरा रोड येथील गीता-आकाशदीप सोसायटीच्या 7व्या मजल्यावर राहणाऱ्या 56 वर्षीय मनोज साने याच्या फ्लॅटमधून 36 वर्षीय सरस्वती वैद्य या त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Mira Road Live in Partner Murder) केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेची माहिती त्याच्या शेजाऱ्याने दिली. सोमेश श्रीवास्तव हा मनोज साने (Manoj Sane) यांचा शेजारी आहे. मनोजच्या फ्लॅटमधून येणाऱ्या दुर्गंधीची माहिती त्याने सर्वप्रथम सोसायटीतील इतर लोकांना सांगितली होती. सोमेश श्रीवास्तव पोलीस पथकासह मनोजच्या फ्लॅटमध्ये दाखल झाला होता. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले दृश्य आता मीडियालाही सांगितलं. (mira road manoj sane live in partner saraswati vaidya murder case neighbour cooker mumbai crime news)

फ्लॅटमधून येत होती दुर्गंधी

मृत मनोज साने यांचा फ्लॅट क्रमांक 704 असल्याचे सोमेश श्रीवास्तव यांनी सांगितले. गेल्या सोमवारपासून त्याला मनोजच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. त्याने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये पाहिले आहे की कशामुळे अशी दुर्गंधी येते.

हे ही वाचा >> किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!

सोमेशने पुढे सांगितले की, त्याने याबाबत त्याच्या आईलाही सांगितले होते. परंतु आईने सांगितले की, उंदीर मेल्यानंतर अशी दुर्गंधी येते. पण तरीही मनोजच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येणं काही कमी झालं नाही. मंगळवारी सकाळपर्यंत दुर्गंधी कायम होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लंच आलो तेव्हाही फ्लॅटमधून…

सोमेश पुढे म्हणाला की, बुधवारी मी घरी जेवायला आलो होतो. मी माझ्या फ्लॅटवर पोहोचताच एक अतिशय उग्र वास येत होता. तो एवढा दुर्गंध होता की, तिथे उभे राहणेही शक्य नव्हते. मी माझ्या आईला सांगितले की मी मनोज काकांशी (आरोपी) बोलणार आहे.

दरवाजा उघडला नाही, आतून स्प्रेचा वास आला

सोमेशने सांगितलं की, मी मनोज काकांच्या फ्लॅटजवळ पोहोचलो आणि जोरजोरात दार ठोठावत राहिलो, पण दरवाजा उघडला नाही. मी 15 मिनिटे दार वाजवत राहिलो पण मनोज काका बाहेर आले नाहीत. या दरम्यान मला फ्लॅटच्या आतून स्प्रेचा आवाज आला आणि सुगंधही आला. मी पुन्हा दरवाजा ठोठावला, पण त्यांनी दरवाजा उघडले नाही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mira Road : ‘या’ माणसामुळे मनोज सानेने केलेल्या लिव्ह-इन पार्टनरच्या हत्याकांडाचं बिंग फुटलं

मनोजने पळून जाण्याचा केलेला प्रयत्न

दरम्यान, सोमेशने पुढे सांगितले की, मनोज साने हा संध्याकाळी परतला. तो लिफ्टने वर येत होता. मनोजने लिफ्टचे गेट उघडताच त्याला समोर पोलीस उभे असल्याचे दिसले. त्यामुळे तो तात्काळ पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर फ्लॅट एजंटने मनोजची माहिती पोलिसांना दिली आणि तो पळून जाण्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याला विचारले की सरस्वतीचे बाकीचे अवयव कुठे आहेत?

ADVERTISEMENT

‘मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले असावेत’

दरम्यान, सोमेशचे असं म्हणणं आहे की, आरोपी मनोज सानेने इमारतीजवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईनमध्ये मृतदेहाचे इतर तुकडे फेकून दिले असावे किंवा भटक्या कुत्र्यांना ते खाऊ घातले असावेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT