Mira Road : ‘या’ माणसामुळे मनोज सानेने केलेल्या लिव्ह-इन पार्टनरच्या हत्याकांडाचं बिंग फुटलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai manoj sane saraswati vaidya live in partner miraroad crime dead body cooker shraddha walkar murder
mumbai manoj sane saraswati vaidya live in partner miraroad crime dead body cooker shraddha walkar murder
social share
google news

Latest Marathi News: मीरारोड: क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडणारी एक घटना मुंबई नजीकच्या मीरारोड (Mira Road Murder) येथे घडली आहे. लिव्ह-इन पार्टनरची हत्या आणि तिच्या मृतदेहाची लावलेली विल्हेवाट यामुळे संपूर्ण मीरारोडमध्ये एकच खळबळ माजली आहे. हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव मनोज साने (वय 56) (Manoj Sane) वर्ष आहे. ज्याने झाड कापण्याच्या कटरने महिलेचे अत्यंत क्रूरपणे तुकडे केले आणि त्यानंतर कूकरमध्ये ते तुकडे शिजवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, हे सगळं प्रकरण एका माणसामुळे बाहेर आलं. याच सगळ्या प्रकरणाबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (manoj sane saraswati vaidya live in partner miraroad crime dead body cooker shraddha walkar murder)

नेमकी घटना काय?

बुधवार (7 जून) सायंकाळी पोलिसांचे पथक अचानक मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले आणि थेट सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटजवळ गेले जिथून प्रचंड दुर्गंधी येत होती. जेव्हा पोलीस या फ्लॅटजवळ पोहचले तेव्हा त्यांना देखील प्रचंड धक्का बसला, कारण दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाबाबत त्यांनी मीडियामध्ये जे काही वाचले आणि ऐकले तेच त्यांना मीरारोडमध्ये पाहायला मिळालं होतं.

घरात सापडले तीन कटर

यावेळी पोलिसांना फ्लॅटमधून महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. सरस्वती वैद्य (वय 36 वर्ष) (Saraswati Vaidya) असे या महिलेचे नाव आहे. यावेळी पोलिसांना घरातच झाडे तोडण्यासाठी वापरलेला कटरही पोलिसांना यावेळी सापडला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ 56 वर्षीय आरोपी मनोज साने याला अटक केली. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता यातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चौकशीवेळी मनोजने पोलिसांना असं सांगितलं की, त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती हिने काही कारणाने आत्महत्या केली होती. जेव्हा तो घरी परतला तेव्हा सरस्वतीचा मृतदेह पाहून तो प्रचंड घाबरला. यावेळी त्याने श्रध्दा वाळकर खून प्रकरणाबाबत बरेच काही ऐकले होते. तीच गोष्ट लक्षात घेऊन त्याने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार केला.

ADVERTISEMENT

मिक्सरमध्ये तुकडे बारीक करून कुकरमध्ये शिजवले

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने मृतदेह कापण्यासाठी बाजारातून झाड कापण्याचं कटर आणलं होतं. तो तीन दिवस घरात आपल्या सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करत होता. आरोपींनी मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. मृत शरीरातून दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून कुकरमधून उकळून घेतले होते. यावेळी त्याने हाडे, मांस आणि रक्त वेगळे केलं होतं. यावेळी मनोजन मृतदेहाचे काही तुकडे उकळून कुत्र्यांनाही खाऊ घातल्याचे सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> 28 मुलांवर बलात्कार आणि हत्या, क्रूर सीरियल किलरची थरारक कहाणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किचनजवळ हिरव्या आणि काळ्या रंगाच्या बादल्या ठेवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये रक्त भरलेलं होतं. तसेच मृतदेहाचे छोटे तुकडे करून त्या बादल्यामध्ये ठेवण्यात आले होते. तसंच एका खोलीत मृत महिलेचे केसही आढळून आले. तसेच खोलीत अनेक काळ्या पिशव्या देखील आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून आता ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पुढील तपासासाठी फ्लॅट क्रमांक 704 सील करण्यात आला आहे.

‘या’ माणसामुळे उघडकीस आलं हत्याकांड

दरम्यान, 704 क्रमांकाच्या फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याची माहिती मनोज सानेच्या शेजाऱ्याने पोलिसांना दिली. मनोजच्या फ्लॅटमधून विचित्र वास येत असल्याची माहिती त्याचे शेजारी सोमेश श्रीवास्तव यांनी सोसायटीतील इतर लोकांना दिली होती. त्यानंतर सोमेश श्रीवास्तव हे पोलीस पथकासह मनोजच्या फ्लॅटमध्ये दाखल झाले. याबाबत सोमेश यांनी सांगितलं की, फ्लॅटमधून विचित्र असा वास येत होता. आपण अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये पाहिले असेल तसंच चित्र इथं होतं.

खरं तर सोमेशने सर्वात आधी त्याच्या आईला दुर्गंधीबाबत सांगितलं होतं. पण त्याच्या आईने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. ती म्हणाली की, उंदीर मेल्यावर असा वास येतो. पण त्यानंतरही वास येणं काही कमी झालं नाही. मंगळवारी सकाळपर्यंत दुर्गंधी कायम होती.

मनोज अंकल म्हणाले, ‘हा तर गटारीचा वास…’

सोमेश पुढे म्हणाला की, ‘मी ठरवलं की, याबाबत मी सोसायटी कमिटीला सांगेन. काही वेळाने मी खाली पोहोचलो आणि कमिटीमधील काही लोकांना याबाबत सांगितलं. आम्ही बोलत असतानाच मनोज अंकल आम्हाला खालीच भेटले. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, तुमच्या फ्लॅटमधून खूप उग्र वास येत आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ही दुर्गंधी गटारामुळे येत आहे. त्याला उत्तर देताना मी म्हणालो की आपण आत जाऊन बघू. यावर अंकल म्हणाले की, मी रात्री परत येतो मग पाहूयात काय ते… असं सांगून मनोज अंकल तेथून निघून गेले.’

हे ही वाचा >> Marine Drive Murder: वसतिगृहात ‘त्या’ खोलीत विद्यार्थिनीसोबत घडलं तरी काय?, Inside Story

पोलिसांना फोन केला, फ्लॅटमध्ये मृतदेह सापडला

‘काका निघून जाताच आम्ही या बाबत नया नगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस देखील तात्काळ आले आणि आम्ही मनोज साने यांच्या फ्लॅटवर पोहोचलो. यावेळी फ्लॅटमध्ये मृतदेह असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे दरवाजा तोडून मी पोलिसांसह फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आत शिरताच प्रचंड तीव्र अशी दुर्गंधी आली. तो घाणेरडा वास एवढा भयंकर होता की, तिथे क्षणभरही उभं राहणं कठीण झालं होतं. यावेळी घरात आम्हाला महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आणि बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या.’ अशी सविस्तर माहिती सोमेश श्रीवास्तव यांनी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT