Sharad Pawar : PM मोदींच्या ऑफरला पवारांचं एका शब्दात उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar reaction on pm narendra modi offer come with nda and bjp lok sabha election 2024
मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे.
social share
google news

Sharad Pawar Reaction on Pm Narendra Modi offer : ओंमकार वाबळे, पुणे  :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, या शरद पवारांच्या विधानाचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांना (Sharad Pawar) एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर दिली होती. मोदींच्या या ऑफरवर आता शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे नेमके पवार काय बोलले आहेत. हे जाणून घेऊयात.  (sharad pawar reaction on pm narendra modi offer come with nda and bjp lok sabha election 2024) 

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ऑफरवर भाष्य केले. आम्हाला सोबत येण्याची ऑफर देताय. तुमचा विचार आणि तुमची सत्ता तुम्हाला लखलाभ असो. व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव असलेल्या, जाती धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षासोबत कदापी जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडत.मोदींची ऑफर धुडकारली. तसेच त्या विचारातून या देशाची सुटका करायची आहे, असे देखील शरद पवार स्पष्टपणे बोलले आहेत. 

हे ही वाचा : 'पवारांसोबत राहूनही अजितदादांनी कधीही...', राज ठाकरेंकडून कौतुक

शरद पवार यांनी यावेळी मोदींवर जोरदार हल्लाही चढवला. पंतप्रधान देशाशी संबंधित मुद्द्यांवर बोलत नाहीत. नको ते विषय काढतात. राहुल गांधींना शहजादा म्हणून हिणवतात. माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करतात. आम्हाला त्याची चिंता नाही. पण मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. कोणी विरोधी भूमिका मांडली, टीका केली तर त्याला तुरुंगात टाकलं जातंय. हा देश हुकूमशाहीकडे चालला आहे, अशी टीका पवारांनी मोदींवर केली. 

हे वाचलं का?

ब्रिटिश सत्तेला आपण महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देश सोडून जायला भाग पाडलं. असं असताना मोदी काय चीज आहे. नेहरू, गांधी परिवाराने देशासाठी दिलेल्या योगदानाच्या एक टक्का तरी योगदान मोदींनी दिले आहे का ? असा खडा सवाल देखील पवारांनी मोदींना केला आहे. तसेच बारामतीच्या मतदानाच्या दिवशी पीडीसीसी बँकेचे कार्यालय रात्री उशिरा सुरू होतं...निवडणूक स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने होऊ द्यायची नाही का ? असा सवाल देखील पवारांनी विचारला आहे. 

हे ही वाचा : PM मोदींचं 'ते' वाक्य लागलं ठाकरेंच्या प्रचंड जिव्हारी!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT