Bhendwal Ghat mandani : देशात कुणाची सत्ता येणार? भेंडवळचं भाकित काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bhendwal bhavishyavani 2024 bhendwal ghat mandani announce prediction of maharashtra rain lok sabha election 2024
भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे.
social share
google news

Bhendwal Ghat Mandani, Lok Sabha Election 2024 : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडळीला भेंडवळचं भाकित (Bhendwal Ghat mandani) असंही म्हणतात. हे भाकित पाहण्यासाठी विदर्भासह खान्देश आणि जवळच्या मध्यप्रदेशातून अनेक जण येत असतात. यंदा लोकसभा  निवडणूक (Lok Sabha Election 2024) होत असल्याने, जनता नेमकी कोणाला निवडून देणार? देशाचा राजा कोण होणार आहे? याची उत्सुकता लागली होती. असे असताना भेंडवळची भविष्यवाणी (bhendwal bhavishyavani)  समोर आली आहे. (bhendwal bhavishyavani 2024 bhendwal ghat mandani announce prediction of maharashtra rain lok sabha election 2024) 

ADVERTISEMENT

भेंडवळच्या भविष्यवाणीत राजकीय भाकीतही वर्तवलं जातात. त्यात यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने या भविष्यवाणीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. या भविष्यवाणीत देशाच्या सत्तेवर कोण येणार? देशाचा पंतप्रधान म्हणजे राजा कोण होणार? याच भाकीत वर्तवूनही देशाची दिशा सांगितली जाते. त्यामुळे या भाकीताकडे अनेकांचे लक्ष लागून होते. 

हे ही वाचा : PM मोदींचं 'ते' वाक्य लागलं ठाकरेंच्या प्रचंड जिव्हारी!

देशात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 13 मेला पार पडणार आहे. तत्पुर्वी आतापर्यंत तीन टप्प्यात मतदानात मतांचा टक्का कमालीचा घसरला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. त्यात आता भेंडवळचं भाकित समोर आलं आहे. त्यानुसार, देशातील राजा कायम असेल. देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल.शत्रू राष्ट्रांच्या कारवाया यावर्षी होणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

पावसाबाबत काय भाकित? 

चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली.यानंतर घट मांडणीतील भाकित वर्तवण्यात आलं आहे. यंदा देशाचा राजा कामय राहील.चांगला पाऊस होईल, खरीप पिक साधारण राहतील. रब्बी हंगामातील गहू पीक सर्वांत चांगल राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आचारसंहिता सुरु असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा : उज्वल निकम आणि करकरेंबद्दलचं 'ते' वक्तव्य वडेट्टीवारांना भोवलं, गुन्हा दाखल!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT