नांदेडमध्ये बोगस मतांचा काळाबाजार, भाजप उमेदवाराच्या मुलीला जबर मारहाण, पत्रकारांना देखील धक्काबुक्की
nanded news : नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील फुले नगरातील मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या मुलीला बेदम मारहाण
पत्रकारांना धक्काबुक्की
Nanded News : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धर्माबाद येथे एका मतदान केंद्रावर मोठा राडा झाला. प्रभाग क्रमांक 1 मधील फुले नगरातील मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचा आरोप आहे. एका महिलेला आणि एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आली. संबंधित महिलेचे नाव हे रचीता गौड जंगमपल्ली असे आहे. ही घटना 20 डिसेंबर रोजी घडल्याचे वृत्त समोर आले.
हे ही वाचा : विवाहित महिलेचं नको तसलंच काम, 27 वर्षीय तरुणाला फसवलं अन्... अश्लील व्हिडिओ बनवून केलं ब्लॅकमेल
भाजप उमेदवाराच्या मुलीला बेदम मारहाण
मारहाण करण्यात आलेल्या रचीता ह्या भाजपच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता गौड जंगमपल्ली यांची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे. आपण धर्माबाद येथील मतदार असून, मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, याच प्रकरणादरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. नंतर एका रस्त्यावर आणून रचीता आणि एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली होती.
पत्रकारांना धक्काबुक्की
विशेष म्हणजे मतदान केंद्रावर पोलीस प्रशासन तैनात असूनही पीडितेला मारहाण करण्यात आली होती. त्याचक्षणी पोलिसांनी सौम्य लाठीचार्च केला. तसेच वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना देखील घटनास्थळी जाण्यास मज्जाव केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी पत्रकारांना देखील धक्काबुक्की केली.
हे ही वाचा : पोलीस ठाण्यात महिला वकिलाला विवस्त्र करून लैंगिक छळ, नंतर जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
अशातच रचीता गौड जंगमपल्ली यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे, पण या प्रकरणाची पुढील प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संगीतले.










