भाजप 140 ते 152 जागा जिंकणार, महाराष्ट्रातील इतर एकही पक्ष 50 चा आकडा गाठणार नाही, Exit Poll ची आकडेवारी

मुंबई तक

Nagar Parishad and Nagar Panchayat Election Exit Poll : राज्यभरातील एकूण आकडेवारी पाहता, भाजप 140 ते 152 नगरपरिषदांमध्ये विजय मिळवू शकतो. शिंदे गट 34 ते 42, अजित पवार गट 24 ते 36 आणि काँग्रेस 24 ते 35 नगरपरिषदांमध्ये आघाडीवर राहू शकतात. शिवसेना (UBT) 3 ते 8 तर शरद पवार गट 4 ते 8 नगरपरिषदांपुरता मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, स्थानिक आघाड्यांना 75 ते 82 नगरपरिषदांमध्ये यश मिळू शकते.

ADVERTISEMENT

Nagar Parishad and Nagar Panchayat Election Exit Poll
Nagar Parishad and Nagar Panchayat Election Exit Poll
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप 140 ते 152 जागा जिंकणार

point

महाराष्ट्रातील इतर एकही पक्ष 50 चा आकडा गाठणार नाही

point

Exit Poll ची आकडेवारी

Nagar Parishad and Nagar Panchayat Election Exit Poll : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. निकालापूर्वीच समोर आलेल्या JDS एक्झिट पोलमुळे कोणत्या विभागात कोणाचा वरचष्मा राहणार, याचा अंदाज बांधला जात आहे. JDS एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात भाजपचा दबदबा राहण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजप 140 ते 152 जागा जिंकणार आणि इतर कोणताही पक्ष 50 जागांचा टप्पा ओलांडू शकणार नसल्याचे संकेत Exit Poll मधून समोर आले आहेत. 21 डिसेंबरला म्हणजे आज 10 वाजल्यापासून निकाल जाहीर होणार असले तरी, एक्झिट पोलमधील आकडेवारी महायुतीच्या बाजूने झुकलेली दिसते.

संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज

राज्यभरातील एकूण आकडेवारी पाहता, भाजप 140 ते 152 नगरपरिषदांमध्ये विजय मिळवू शकतो. शिंदे गट 34 ते 42, अजित पवार गट 24 ते 36 आणि काँग्रेस 24 ते 35 नगरपरिषदांमध्ये आघाडीवर राहू शकतात. शिवसेना (UBT) 3 ते 8 तर शरद पवार गट 4 ते 8 नगरपरिषदांपुरता मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, स्थानिक आघाड्यांना 75 ते 82 नगरपरिषदांमध्ये यश मिळू शकते.

विभागनिहाय चित्र काय सांगते?

विदर्भात काय होणार?

विदर्भात भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र आहे. एक्झिट पोलनुसार भाजप 61 जागांवर आघाडीवर असून काँग्रेसला 19 जागा मिळू शकतात. शिंदे गट 7, अजित पवार गट 5 जागांवर समाधान मानू शकतो. शिवसेना (UBT) आणि शरद पवार गटाला फारसे यश मिळताना दिसत नाही. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि इतर घटक प्रभावी ठरू शकतात.

पश्चिम महाराष्ट्र : साखर पट्ट्यात यंदा चुरशीची लढत अपेक्षित आहे. भाजप 27 जागांवर आघाडीवर असला तरी स्थानिक आघाड्यांना 21 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अजित पवार गटाला 12 तर शिंदे गटाला 7 जागा मिळू शकतात. काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि शरद पवार गट येथे मर्यादित प्रभाव दाखवताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp