LIVE: तुमच्या जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा संपूर्ण निकाल, पाहा निकालाचे प्रत्येक अपडेट
Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election Result: राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 आणि 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आलं. ज्याचा निकाल आज (21 डिसेंबर 2025) जाहीर होत आहे. जाणून घ्या राज्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल
पाहा जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे नेमके काय निकाल
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिल्या टप्प्यातील महत्त्वाच्या निवडणुकांचे निकाल
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 226 नगर परिषदा आणि 38 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेण्यात आलं तर 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेण्यात आलं. ज्यानंतर आज (21 डिसेंबर) या मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. मागील साधारण 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. ज्या आता अखेर पार पडत आहेत. या निवडणुकांमुळे राज्यात कोणत्या राजकीय पक्षाची किती ताकद आहे हे देखील जोखलं जाणार आहे. अशावेळी प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे नेमके निकाल आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत.









