महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली, नेमकं कारण काय?
Parag Shah : मुंबईतील घाटकोपरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भाजप आमदाराने एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पराग शहांनी रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Parag Shah : मुंबईतील घाटकोपरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भाजप आमदाराने एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली आहे. ते आमदार दुसरे तिसरे कोणीही नसून पराग शहा आहेत. पराग शहांनी असं कृत्य का केलं? या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर, भाजप आमदार पराग शहांनी घाटकोपरच्या पूर्वेकडील भागाला भेट दिली होती. तेव्हा त्यांना वाहतूक आणि पदपथांवर अवैधपणे सुरु असलेल्या फेरिवाल्यांमुळे पादचाऱ्यांना मोठ्या गौरसोयीचा सामना करावा लागतो हे त्यांनी पाहिलं. याचदरम्यान, एका ऑटो रिक्षाचालकाला त्यांनी बेदम मारहाण केली.
हे ही वाचा : नांदेडमध्ये बोगस मतांचा काळाबाजार, भाजप उमेदवाराच्या मुलीला जबर मारहाण, पत्रकारांना देखील धक्काबुक्की
पराग शहांनी रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली
मिळालेल्या माहितीनुसार, पराग शहा हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाहणी करत होते. तेव्हाच एका रिक्षाचालकाने वाहतुकीचे सर्व नियम मोडले आणि चुकीच्या दिशेने रिक्षा नेताना रिक्षाचालक दिसला होता. हे सर्व पाहून संतापलेल्या आमदार पराग शहांनी त्याची रिक्षा थांबवली आणि त्याच्या कानशिलात लगावली होती. घटनेचा सर्व प्रकार हा एका व्हिडिओत कैद झाला आहे. तसेच तो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसतोय.
हे ही वाचा : विवाहित महिलेचं नको तसलंच काम, 27 वर्षीय तरुणाला फसवलं अन्... अश्लील व्हिडिओ बनवून केलं ब्लॅकमेल
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात आता विरोधकांनी पराग शहांवर टीकेची तोफ डागली आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की, 'वाहतूक मोडणाऱ्यांवर पोलिसांनीच कारवाई करावी, आरटीओने कारवाई करावी. हे काम आमदारांचे नाही,' असे विरोधकांनी सांगितलं.










