Arvind Kejriwal: 'घोटाळा, उपमुख्यमंत्री...', तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल अजितदादांवर का तुटून पडले?
Lok Sabha Election 2024: तुरुंगातून नुकतंच बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद अजित पवारांवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Arvind Kejriwal on Ajit Pawar: नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्याने आता ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ते निवडणूक प्रचाराच्या कामाला लागले. त्याआधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी मोदी-शाहा यांच्यावर तुफान हल्ला चढवला. एवढंच नव्हे तर अजित पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला. (scam deputy chief minister why did arvind kejriwal lash out at ajit pawar after coming out of jail)
ADVERTISEMENT
'ज्या लोकांबाबत मोदीजी म्हणत होते की, त्यांनी 70 हजार कोटींचा यांनी घोटाळा केला. थोड्याच दिवसात त्याच माणसाला आपल्यासोबत घेऊन कोणाला उपमुख्यमंत्री बनवलं..' असं म्हणत केजरीवाल यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
हे ही वाचा>> Sharad Pawar : PM मोदींच्या ऑफरला पवारांचं एका शब्दात उत्तर
याशिवाय अरविंद केंजरीवाल यांनी असाही आरोप केला की, देशातील सगळे चोर आणि दरोडेखोर यांना भाजप आपल्या पक्षात घेत आहे. अशाप्रकारचे अनेक गंभीर आरोप केजरीवाल यांनी केले आहेत.
हे वाचलं का?
पाहा अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले...
'पंतप्रधान म्हणतायेत की, ते भ्रष्टाचाराशी लढतायेत.. देशातील सर्वात मोठ्या चोर-दरोडेखोरांना त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलं. ज्या लोकांबाबत मोदीजी म्हणत होते की, त्यांनी 70 हजार कोटींचा यांनी घोटाळा केला. थोड्याच दिवसात त्याच माणसाला आपल्यासोबत घेऊन कोणाला उपमुख्यमंत्री बनवतात तर कोणाला मंत्री बनवतात.. आणि त्यांचे सगळे ईडी-सीबीआयचे केसेस संपवून टाकतात.. आणि म्हणतात की मी भ्रष्टाचाराशी लढतोय..'
'मी मोदींना सांगू इच्छितो की, भ्रष्टाचाराशी लढाई कशी लढायची हे शिकायचं असेल तर केजरीवालकडून शिका.. भ्रष्टाचाराविरोधात लढाई केजरीवालने लढली आहे.'
हे ही वाचा>> PM मोदींचं 'ते' वाक्य लागलं ठाकरेंच्या प्रचंड जिव्हारी!
'2015 मध्ये आमचं जेव्हा सरकार बनलं होतं.. तेव्हा आमच्या एका मंत्र्याचा एक ऑडिओ माझ्याकडे आला होता. त्या ऑडिओमध्ये मंत्री एका दुकानवाल्याकडून 5 लाख रुपये मागत होता. कोणत्याही मीडियावाल्यांना किंवा विरोधी पक्षाला काही माहिती नव्हतं.'
ADVERTISEMENT
'मी माझ्या मंत्र्याला स्वत: सीबीआयच्या हवाली केलं. जेल पाठवलं होतं. ही असते भ्रष्टाचाराविरोधातील लढाई. पंजाबमध्ये एक मंत्री पैसे मागत असल्याचं समजलं तेव्हा मान साहेबांनी आणि आम्ही आमच्या मंत्र्याला उचलून तुरुंगात पाठवलं..'
ADVERTISEMENT
'तुम्ही तुमच्या पक्षात देशातले सगळे चोर-डाकू यांना घ्या आणि केजरीवालला तुरुंगात पाठवा.. तर पंतप्रधान तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात अजिबात लढत नाही. तुम्ही देशवासियांना मूर्ख समजू नका.' असं म्हणत केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT