Sleep : तुम्ही रात्री पुरेशी झोप घेत नाही? करावा लागू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा सामना

मुंबई तक

ADVERTISEMENT

The risk of peripheral artery disease is much higher in people who get less sleep at night
The risk of peripheral artery disease is much higher in people who get less sleep at night
social share
google news

Helath News :

ADVERTISEMENT

झोप ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला कमी-अधिक प्रमाणात हवीहवीशी वाटते. काही लोक जास्त झोपतात तर काही लोक धावपळीच्या आयुष्यामुळे पुरेशी झोप घेत नाहीत. पण प्रत्येक व्यक्तीने किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप घेतली पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. स्वीडनमधील नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं की जे लोक रात्री 5 तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांना पेरीफेरल आर्टरी डिसीज होण्याचा धोका 74% जास्त असतो. या संशोधनादरम्यान, संशोधकांना आढळून आलं की संपूर्ण जगात सुमारे 20 कोटी लोक या आजारने त्रस्त आहेत. (The risk of peripheral artery disease is much higher in people who get less sleep at night)

पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणजे काय?

पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळे धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊन त्या आकुंचन पावू लागतात, त्यामुळे पाय आणि हातांमधील रक्तप्रवाह लक्षणीयरीत्या कमी होतो. पायापर्यंत योग्य प्रमाणात रक्त न पोहोचल्यास व्यक्तीला चालताना समस्या उद्भवतात. धमन्यांमधील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची समस्याही भेडसावते.

हे वाचलं का?

हेही वाचा : जास्त पाणी पिणं ठरु शकतं आरोग्याला धोकादायक; किती असावं दिवसाचं प्रमाण?

या संशोधनाशी संबंधित संशोधकांनी सांगितले की, जे लोक रात्री 7 ते 8 तास पूर्ण झोप घेतात त्यांना या रोगाचा धोका कमी प्रमाणात संभवतो. तर जे लोक 5 तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांना पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका दररोज 7 ते 8 तास झोपलेल्या लोकांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट असतो. पेरिफेरल आर्टरी डिसीजच्या समस्येने ग्रस्त असलेल्या रुग्णांना रात्री झोपताना खूप समस्यांना सामोरे जावे लागते. झोप न लागणे आणि पूर्ण न होण्याच्या समस्या उभ्या राहतात.

हेही वाचा : Love Story : ट्यूशनला जाणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला सिक्युरिटी गार्ड; पळून जातं थाटला संसार

संशोधकांनी पेरिफेरल आर्टरी डिसीजच्याच्या जोखमीसह झोपेचा कालावधी आणि दिवसा झोपेचे विश्लेषण केले. तर, दुसऱ्या भागात, संशोधकांनी अनुवांशिक डेटाचा वापर करून त्यामागील कारणे जाणून घेतली.हे संशोधन युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनात 650,000 पेक्षा जास्त लोकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र काही संशोधकांनी सांगितले यात अजून संशोधन होणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Namibian cheetah Sasha: कुनोतील साशा चित्त्याचा मृत्यू कशामुळे झाला?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT