Maharashtra SSC Result 2023 : आज दहावीचा निकाल ! कुठे, कसा बघायचा?
शुक्रवार, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन (maharashtra ssc result 2023 official website) पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra SSC Result 2023 date and time : मे महिन्यापासून ज्याच्याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं होतं, त्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली असून, आज म्हणजेच शुक्रवार, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन (maharashtra ssc result 2023 official website) पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. (Maharashtra Higher Secondary Board Result 2023 Date)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2023 मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्य मंडळातर्फे देण्यात आली आहे.
हेही वाचा >> ‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?
राज्य मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला राज्यातून (Maharashtra) 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 लाख 33 हजार 67 मुलींनी ही परीक्षा दिलेली आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडली. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता बऱ्याच दिवसांपासून परीक्षार्थी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन निकालाची ऑनलाइन प्रिंटआऊट काढता येणार आहे.
maharashtra ssc result 2023 link official website : इथे पाहता येणार निकाल
दहावीचा निकाल खाली दिलेल्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
ADVERTISEMENT
– mahresult.nic.in
– https://ssc.mahresults.org.in
– http://sscresult.mkcl.org
ADVERTISEMENT
How to check ssc Result 2023 : असा बघा निकाल
विद्यार्थ्यांनो, दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या. संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा >> ‘सत्य समोर यायला हवे’, भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी मोदी सरकारला सुनावलं
क्लिक केल्यानंतर नव्या पेजवर Roll Number आणि आईचे नाव टाका. त्यानंतर लगेच तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. मार्कशीट म्हणजेच गुणपत्रक बघा. त्यानंतर त्याची प्रिंट घ्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT