Video : बेल्ट काढला अन् सपासपा मारत सुटला, सुसाट ट्रेनमध्ये…

मुंबई तक

ADVERTISEMENT

man hits passengers on movin train with belt railway assure action bihar viral video
man hits passengers on movin train with belt railway assure action bihar viral video
social share
google news

Bihar Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात.असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एका माथेफिरू तरूणाने धावत्या ट्रेनमधील प्रवाशांवर बेल्टने हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ नंतर आता सबंधित तरूणावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (man hits passengers on moving train with belt railway assure action bihar viral video)

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एक तरूण ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून समोरून धावणाऱ्या प्रवाशावर बेल्टने (पट्टयाने) हल्ला करत आहे. धावत्या ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या किंवा बसलेल्या प्रवाशांवर माथेफिरू तरूणाने बेल्टच्या सहाय्याने हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडिओ त्याच्यासोबतच प्रवास करणाऱ्या एका मित्राने कॅमेरात कैद असल्याचे समजते आहे. हा व्हिडिओ बिहार राज्यातला असल्याची माहिती आहे.

दरम्यान माथेफिरू तरूणाच्या धावत्या ट्रेनवरील ह्ल्ल्याने प्रवाशी जखमी होण्याची दाट शक्यता होती. काही प्रवाशांचा तर तोल जाऊन ट्रेनमधून पडून मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यामुळे माथेफिरू तरूणाच्या प्रतापाने प्रवाशांकडून संतपा व्यक्त होत होता. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून संबंधीत तरूणाच्या कृत्यावर आक्षेप घेतला. याचसोबत तरूणावर कारवाई करण्याची मागणी केली.

हे वाचलं का?

हा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर व्हायरल झाला असून तो 4 लाख 60 हजार नागरीकांनी पाहिला आहे. तर 4 हजारहून अधिक नागरीकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या युझरने आरोपी युवकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

ADVERTISEMENT

जर ही मस्ती आहे तर ती खूप जीवघेणी आहे, असे ट्विट एका युझरने केले आहे. अशा माथेफिरूंना तरूणांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यास रोखले पाहिजे असे दुसऱ्या युझरने म्हटले आहे. हा माणूस वेडा आहे का, त्याच्या या कृतीने इतर प्रवाशी जखमी होतील, असे एका तिसऱ्या युझरने म्हटले.दरम्यान या व्हि़डिओची दखल रेल्वेने आता घेतली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पूर्व मध्य रेल्वेने याप्रकरणी कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT