दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आज होणार जाहीर? वेळ काय असेल, जाणून घ्या एका क्लिकवर
CBSE Result 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12 व वाहिनीची निकाल व विद्यार्थ्यांना हवी आहे. आज 12 दिवशी निकाल केला जाईल अशी मे आहे. निकाल पाहण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सीबीएसई दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आज होणार जाहीर?
वेळ काय असेल, एका क्लिकवर घ्या जाणून
CBSE Result 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना निकालाची चाहूल लागली आहे. आज 12 मे दिवशी निकाल जाहीर केला जाईल अशी शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी results.cbse.nic.in, cbseresults.nic.in, results.digilocker.gov.in आणि cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
यासाठी सीबीएसई निकाल 2025 तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना सीट नंबर, सेंटर नंबर आणि जन्मतारीख भरण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर निकाल पाहण्याच्या पुढील प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
हेही वाचा : CBSE Result 2025 : सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार? 'या' लिंकवर पाहा रिझल्ट, 42 लाख विद्यार्थी..
निकाल कधी होणार जाहीर?
मागील वर्षी सीबीएसई विद्यार्थ्यांचा निकाल हा सकाळी 10 ते दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला होता. मात्र, शिक्षण मंडळाकडून अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नसल्याने निकालाची तारीख समोर आली नाही. निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी खाली दिलेली माहिती समजून घ्यावी.










