Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना जीवाची बाजी लावून पकडणारे ते 'सिंघम' कोण?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून झाली. या घटनेने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना पकडणारे API राजेंद्र दाभाडे कोण?
मुंबई क्राइम ब्रँचकडून 15 पथके तयार
फरार आरोपी शेवटचा पनवेलमध्ये दिसला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून झाली. या घटनेने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. ही घटना घडली त्यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने धाडस दाखवत जीव धोक्यात घालून सिद्दीकींच्या मारेकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. एपीआय राजेंद्र दाभाडे असे या धाडसी पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्यांनी बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या तीनपैकी दोन मारेकऱ्यांना पकडले. (ncp leader Baba Siddique shot dead who is API rajendra dabhade who arrested two accused of Baba Siddique at bandra firing)
ADVERTISEMENT
मुंबई पोलीस एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची पर्वा न करता धावत जाऊन बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटर्सना पकडले. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोन आरोपींच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. तिसरा आरोपी शिवकुमार गौतम गर्दीचा फायदा घेत फरार झाला. जिथे बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तिथे एपीआय राजेंद्र दाभाडे देवी विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. यावेळी बाबा सिद्दीकींना गोळी लागल्याचे पाहून क्षणाचाही विलंब न लावता आरोपींचा पाठलाग केला. त्यांच्या या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. यातून मुंबई पोलिसांची चमकदार कामगिरी समोर आली आहे.
हेही वाचा : Baba Siddique Murder : सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट! शूटरच्या टार्गेटवर होते आमदार झिशानही...
मुंबई क्राइम ब्रँचकडून 15 पथके तयार
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेने 15 पथके तयार केली आहेत. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींकडून 28 जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. यातील एक मोबाईल फक्त कॉलिंगसाठी होता. दुसरा नियमित वापरासाठी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, एक आरोपी अजूनही फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग आहे. तर, शिव कुमार गौतम नावाचा आरोपी अजूनही फरार आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! मुंबईत 'या' वाहनांसाठी आज रात्रीपासून टोलमाफीचा निर्णय
फरार आरोपी शेवटचा पनवेलमध्ये दिसला
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला फरार आरोपी शिवकुमार गौतम हा शेवटचा पनवेल स्टेशनवर दिसला. तिथून तो बाहेरच्या राज्यात पळून गेल्याचा संशय आहे. त्याचवेळी आरोपी शिवकुमारच्या शोधासाठी पोलिसांची पथकं मध्य प्रदेशातील उज्जैन, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि दिल्लीकडे रवाना झाली आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT