Lok sabha Security Breach : संसदेच्या सुरक्षेत चूक, सचिवालयाची 8 जणांवर मोठी कारवाई

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

parliament security breach 8 security guards suspended lok sabha secretariat parliament attack new delhi
parliament security breach 8 security guards suspended lok sabha secretariat parliament attack new delhi
social share
google news

Parliament security breach 8 security guards Suspended : संसदेच्या सुरक्षेत बुधवारी मोठी चुक झाली होती. चार तरूणांनी संसदेत घुसखोऱी करून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी आता सहा जणांना अटक झाली आहे. या अटकेनंतर संसदेच्या सुरक्षेत चुक झाल्याप्रकरणी आता 8 सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. (parliament security breach 8 security guards suspended lok sabha secretariat parliament attack new delhi)

ADVERTISEMENT

संसदेच्या सुरक्षेत चुक झाल्या प्रकरणी आता 8 सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश,अनिल, प्रदीप, विमित, नेरंद्र अशी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांची नावे आहेत. सुरक्षेत त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत लोकसभा सचिवालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आज अधिवेशनात सुरक्षेच्या मुद्यावरून लोकसभेत गदारोळही झाला होता.

हे ही वाचा : ‘अमोल शिंदे, सागर, नीलम आणि…’, संसदेच्या सुरक्षेची पोलखोल करणारे ‘ते’ चौघे आहेत तरी कोण?

संसदेत काय घडलं?

खरं तर बुधवारी संसदेची सुरक्षाभेदून चार जणांनी घुसखोरी केली होती. यामधील नीलम (42) आणि अमोल शिंदे (25) या दोघांनी संसदेच्या बाहेरील परीसरात गोंधळ घातला होता. त्याच दरम्यान इतर दोघे म्हणजेच सागर शर्मा आणि मनोरंजन या दोघांनी थेट लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरी गाठली होती. या प्रेक्षक गॅलरीतून नंतर त्यांनी सभागृहातील खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या होत्या. यातील एका तरूणाने बाकावर उड्या मारल्यानंतर बुटातून स्प्रे काढून सभागृहात फवारला होता. त्यानंतर खासदारांनी मिळून त्याला ताब्यात घेतले होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अमोल शिंदेच्या मदतीला महाराष्ट्राच्या ‘या’ वकिलाची धाव, कायदेशीर लढा देणार!

या प्रकरणी आता सहा जणांना अटक झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीसीच्या कलम 452 (अतिक्रमण) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) व्यतिरिक्त यूएपीएच्या संबंधित कलमांखाली या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT