Chandrayaan-3 : आता प्रज्ञान रोव्हर फक्त आठवडाभर काम करणार; कारण समजून घ्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

chandrayaan 3 camera work only week
chandrayaan 3 camera work only week
social share
google news

Chandrayaan-3 : भारताने मागील आठवड्यात इस्त्रोकडून चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले आणि अंतराळ विश्वात भारताने मोठी क्रांती घडवून आणली. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पाठवणारा भारत हा पहिलाच देश आहे. याच बरोबर अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा चौथा देश आहे. चांद्रयान-3 चे लँडर विक्रमकडून आा व्हिडिओ आणि तेथील काही फोटो आता समोर आले आहेत. विक्रमप्रमाणेच आता रोव्हरही चंद्रावरची माहिती सातत्याने देत आहे. (Pragyan rover in Chandrayaan 3 mission will now work for week)

प्रज्ञान रोव्हरचं नेमकं कार्य

इस्त्रोकडूनही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी मून विक्रम लँडर आणि चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत. इस्त्रोने सांगितले आहे की, प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठाभागावर आठ मीटर अंतरावर गेले आहे. तर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडर रँपवरून बाहेर पडताना दिसून येत आहे.

भारताची ही मोहिम आता मानवयुक्त…

चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचल्यानंतर आता प्रज्ञान रोव्हरकडून त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आहे. तेथील पृष्ठभागाचे अन्वेषण, चंद्राच्या भू-गर्भशास्त्राचे रहस्य, तेथील रचना आणि इतिहास उलघडण्यात येणार आहे. त्याचबरोबर चांद्रयान-3 रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाच्या खनिज रचनेचे विश्लेषण करण्याबरोबरच 14 त्याबाबतचे प्रयोग केले जाणार आहेत. या यशस्वी झालेल्या मोहिमेनंतर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, भारताकडून पुढील मोहिमा या मानवयुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विक्रम-प्रज्ञानचा कार्यकाळ

रोव्हरकडून चंद्रावर एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवस काम करणार आहे. रोव्हर प्रज्ञानमधील सहा चाकांबरोबर त्यामध्ये नेव्हिगेशन कॅमेरे आणि 50W सोलर पॅनेलही बसवण्यात आले आहेत. हे Rx/Tx अँटेनाद्वारे थेट लँडरशी जोडले जात असून त्यामधून ही माहिती घेतली जाणार आहे. विक्रम कॅमेऱ्याचे फोटो क्लिक करुन लँडरला पाठवले जाणार आहेत. विक्रम-प्रज्ञान लँडिंगनंतर 14 दिवस हे काम चालू ठेवू शकणार आहेत. कारण विक्रम आणि प्रज्ञान यांचा कार्यकाळ इतकाच राहणार आहे.

वीज निर्मिती थांबणार

आतापर्यंत चांद्रयाने लँडर आणि रोव्हर त्यांच्या सोलर पॅनलद्वारे ऊर्जा निर्माण केली जात आहे. तर 14 दिवसानंतर त्या ठिकाणी रात्र असणार आहे. त्यामुळे तो काळ कठीण असणार आहे. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी प्रकाश मिळाला नाही तर वीज निर्मितीची प्रक्रिया तेथील थांबणार आहे. त्या प्रकारची ऊर्जा तिथे उपलब्ध झाली नाही तर तेथील थंड वातावरण हे सहन होणार नाही. त्यामुळे विक्रम आणि प्रज्ञान लँडर हे 14 दिवसच काम करणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT