Sambhaji Bhide : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
ADVERTISEMENT
Prithviraj Chavan News : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. या घटनेने खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देण्यात आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिव प्रतिष्ठाने प्रमुख संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली होती. संभाजी भिडेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना कॉलसह मेलवरूनही धमकी देण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी धमकीचा कॉल आणि मेल करण्यात आला. त्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली.
हे वाचलं का?
वाचा >> Sambhaji Bhide : भिडेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपशी संबंध…”
पोलिसांनी धमकीची दखल घेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण येथील घराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
‘संभाजी भिडेंना अटक करा’
अधिवेशन सुरू असतानाच अमरावती येथे बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधी यांच्याबद्दल गंभीर विधान केलं होतं. ‘महात्मा गांधी यांच्या वडिलांचं नाव करमचंद असं सांगितलं जातं, पण त्यांचे वडील मुस्लिम जमीनदार होते. महात्मा गांधींच्या आईसोबत मुस्लिम जमीनदार पत्नीसारखा व्यवहार करायचे’, असं संभाजी भिडे म्हणाले.
ADVERTISEMENT
संभाजी भिडे यांच्या याच विधानामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावर आक्षेप घेतला होता. विधानसभेत बोलताना “संभाजी भिडेंनी भारताच्या राष्ट्रपित्याबद्दल निंदापूर्वक विधान केले. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम 153 अन्वये अटक केली पाहिजे. हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. संभाजी भिडे हा व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल असं विधान करून बाहेर कसा फिरू शकतो?”, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
ADVERTISEMENT
भिडेंवर कारवाई करणार -फडणवीस
दरम्यान, या वादाच्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली असून, “संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केल आहे त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि अशा महानायक बद्दल अशा प्रकारचं व्यक्तव्य करणं हे पूर्णपणे अनुचित आहे”, असं ते म्हणाले.
वाचा >> ITR e filing process : 15 मिनिटांत स्वतःच इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा?
त्याचबरोबर “माझं स्पष्ट मत आहे की, अशा प्रकारचे वक्तव्य भिडे गुरुजींनी करू नये आणि कुणीच करू नये करोडो करोडो लोकांचा अशा व्यक्तव्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी संताप तयार होतो. लोक महात्मा गांधींबद्दल असं बोललेलं कधीच सहन करणार नाही. या संदर्भात जी उचित कारवाई करायची आहे, ती राज्य सरकार करेल”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT