Ratnagiri : ऐकावं ते नवलंच! व्हेल माशाच्या पिलाचा मानसिक तणावामुळे मृत्यू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ratnagiri baby whale fish died ganpatipule beach postmortem report mental stress
ratnagiri baby whale fish died ganpatipule beach postmortem report mental stress
social share
google news

गोकुल कांबळे, रत्नागिरी

Ratnagiri Baby Whale Fish Died Postmortem Report : रत्नागिरीतील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule Beach)  समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाला (Baby Whale Fish) 40 तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुन्हा समुद्रात सोडण्यात आले होते. मात्र इतके अथक प्रयत्न करून सुद्धा 16 नोव्हेंबरला त्या व्हेल माशाचा मृत्य झाला होता. या मृत्यूनंतर त्याचं शवविच्छेदन (postmortem report) करण्यात आले. या शवविच्छेदनानंतर आता त्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात आईच्या दुधाअभावी आणि मानसिक तणावामुळे व्हेल माशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने प्राणीप्रेमींमधून शोक व्यक्त होतोय. (ratnagiri baby whale fish died ganpatipule beach postmortem report mental stress)

गेल्या 13 नोव्हेंबरला समुद्रात ओहोटी असल्याने व्हेल मासा गणपतीपुळे समुद्रकिनारी आला होता. तब्बल 3 टन वजन असलेल्या या व्हेल माशाला अनेकवेळा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. यासाठी तब्बल 40 तास रेस्क्यु ऑपरेशनही राबवले गेले होते. या यशस्वी ऑपरेननंतर त्याला सुखरूपरित्या समुद्रात सोडण्यात आले होते. मात्र 15 नोव्हेंबरला हे व्हेल माशाचे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले होते.त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manoj Jarange : ‘…मग अजितदादा अन् देवेंद्र फडणवीसांना कुठं पाठवतो?’, जरांगेंचा भुजबळांना सवाल

शवविच्छेदन अहवालात काय?

व्हेल माशाच्या पिल्लाच्या मृत्यूनंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आले होते. आता याच शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात उपासमार आणि मानसिक तणाव ही दोन मृत्यूची प्रमुख कारणे सांगण्यात आली आहेत. काही महिन्यांचे पिल्लू आपल्या आईपासून दुरावले आणि दुधाअभावी त्याची उपासमार झाली. तसेच कळपापासून लांब गेल्यामुळे त्याच्यावर मानसिक ताण आला आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला आहे. व्हेल माशाच्या मृत्यूनंतर आता त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले आहे.

पिल्लांसाठी आई करते शिकार

व्हेलमासा हा सस्तन मासा आहे. त्याची पिल्ले 2 वर्षांची होईपर्यंत आईच्या दुधावरच जगतात. सगळेच मासे कळपाने राहतात. व्हेलमासाही कळपानेच वावरतो. मात्र, आई आणि तिची पिल्ले कळपापासून थोडे वेगळे असतात. एखादे पिल्लू दगावले तर त्याची आई शोकही व्यक्त करते. माणसांमध्ये आढळणाच्या भावना व्हेलमाशातही मोठ्या प्रमाणात आढळतात.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : World Cup 2023 :…तर भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ ठरणार विश्व विजेते!

व्हेलमाशाची पिल्ले 2 वर्षांची होईपर्यंत आईचे दूध पितात आणि त्यांना शिकार देखील आईच करून देते. तीन वर्षांची झाल्यानंतर ही पिल्ले स्वतःच शिकार करू लागतात.माणसांपेक्षा अधिक संवेदनशीलता प्राण्यांमध्ये असते. कळपातच या माशांना छोट्या माशांच्या शिकारीचे प्रशिक्षणही मिळते.

ADVERTISEMENT

कळपाबाहेर गेल्यास मानसिक ताणात येतात

व्हेलमासा अधिक वजनदार असतो. गणपतीपुळे किनाऱ्यावर आलेले पिल्लूच तीन ते साडेतीन टन वजनाचे होते. असे वजनदार मासे पाण्यात स्वतःचे वजन आरामात पेलतात. मात्र, जेव्हा ते किनाऱ्यावर येतात किंवा वाळूत अडकून राहतात, तेव्हा त्यांचे हे वजन त्यांच्याच जिवावर बेतू शकते. अशावेळी त्यांचे फुफ्फुस तुटून अंतर्गत रक्तस्राव होण्याची भीती अधिक असते, असे शिरगाव मत्स्य महाविद्यालयाच्या प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले आहे.

व्हेलमाशाचे पिल्लू आपल्या कार्यक्षेत्राबाहेर गेले किंवा आपल्या कळपाबाहेर गेले तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामूळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो. त्यात ते दगावण्याची भीती असते. त्यामुळे संकटात सापडलेल्या, कळपाबाहेर गेलेल्या प्राण्यांच्या मदतीसाठी अधिक गतीने हालचाल करणे गरजेचे असते, चिपळूणच्या परिक्षेत्र वनअधिकारी राजश्री कीर
यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT