‘शरद पवारांवर खालच्या पातळीवरची टीका बंद करा अन्यथा तुमची..’, रोहित पवार संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

stop low level criticism of sharad pawar ncp mla rohit pawar furious kolhapur bjp
stop low level criticism of sharad pawar ncp mla rohit pawar furious kolhapur bjp
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: ‘राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केली जात आहेत भाजपचे काही वरिष्ठ नेते अशा वक्तव्यांना पाठबळ देत असून खासदार शरद पवारांच्यावर बोलणं बंद करा अन्यथा तुमची झोप उडवू.’ असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. (stop low level criticism of sharad pawar ncp mla rohit pawar furious kolhapur bjp)

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून केली. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेतला. राज्याचे मुख्यमंत्री लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत यावेळी त्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे उपक्रम म्हणजे सरकारी इव्हेंट असल्याची टीका पवार यांनी केली. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी यांच्यावर जबाबदारी दिली आहे. लोकं आपल्या सोबत असल्याचे दाखवण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.

चित्रा वाघ आता एका मंत्र्याबद्दल बोलायच्या बंद झाल्या

भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ महाविकास आघाडी सरकार असताना आणि आता देखील मंत्री असलेल्या नेत्यावर त्या बोलत नाहीत. त्यांच्या सोयीप्रमाणे चित्रा वाघ बोलत असतात त्यांच्याकडे नवे मुद्दे नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार असताना महिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होणाऱ्या चित्रा वाघ आता महिला अत्याचार होत असताना गप्प का? असा सवाल ही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोल्हापूरची दंगल घडली की घडवली?

दोन धर्मात धार्मिक मुद्द्यावर सोशल मीडियाचा आधार घेऊन धर्मांध शक्तींनी कोल्हापुरातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवले. दंगल झाल्यानंतर सामान्य नागरिकांचं नुकसान होतं. ही दंगल घडली का घडवली? हे पहावं लागेल, कारण घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचले होते, त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवला गेला नाही. समाजात वाद निर्माण कसा राहील याचा प्रयत्न केला जात असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

भाजप नेहमी संविधानविरोधी वागलं!

भाजप हे संविधानाच्या विरोधात कार्यकर्त्यांना भडकवत आहे का हे पहावं लागेल, भाजप नेहमी संविधान विरोधी वागले आहेत, यापूर्वीही भाजपने देशभरातील अनेक ठिकाणी धार्मिक मुद्द्यावर वातावरण तापवून निवडणुका आपल्या खिशात घातल्याच्या घटना समोर आहेत. कर्नाटकात जसे जनतेने जागा दाखवली तशी जागा महाराष्ट्रातील जनता करेल, भाजप इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आहे. चुकीच्या पद्धतीने बोलणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाते. चुकीचा वागला तरी कार्यकर्त्याची बाजू भाजप घेत असते यामुळे देशासह राज्यात धार्मिक उन्माद वाढत आहे.

ADVERTISEMENT

ठाण्यात श्रीकांत शिंदे यांच्या जागी भाजपचा खासदार होणार

राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जाणीवपूर्वक भाजप आपल्या पक्षाचा विस्तार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अंधारात ठेवून ठाण्याच्या लोकसभेच्या जागेवर श्रीकांत शिंदे ऐवजी भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी काही नेत्यांवर दिली आहे. पद मिळवण्यासाठी फडतूसगिरी चालू असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात पन्नास टक्के कमिशनची चर्चा

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चाळीस टक्के कमिशनचा मुद्दा गाजला होता. राज्य सरकारमधील भ्रष्टाचारामुळेच कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला जनाधार दिला आता महाराष्ट्रातील कृषी विभागात कृषी अधिकाऱ्यांना वसुलीच्या सूचना दिल्या आहेत.‌ त्यामुळे कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार होत आहे कर्नाटकात 40 टक्क्यांची चर्चा होती मात्र महाराष्ट्रात पन्नास टक्के वसुली सुरू झाली आहे अशी टीका ही पवार यांनी यावेळी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT