Sangli News : भयंकर! 'कुमार महाराष्ट्र केसरी' पैलवानाने घेतला गळफास
Suraj Nikam Suicide : सांगती जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागनाथनगर,नागेवाडी येथे राहत्या घरी सूरज निकमने आत्महत्या केली होती. शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
Suraj Nikam Suicide: स्वाती चिखलीकर, सांगली : जिल्ह्यातील युवा पैलवान सूरज निकम याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरज निकम (Suraj Nikam) हा ''युवा महाराष्ट्र केसरी'' पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही आहे. पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. (suraj nikam suicide kumar maharashtra kesari young wrestler commit suicide shocking story)
सांगती जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागनाथनगर,नागेवाडी येथे राहत्या घरी सूरज निकमने आत्महत्या केली होती. शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान सूरज निकमच्या आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही आहे. पोलीस या प्रकणात आता सूरज निकमच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पवारांनी संपवला गोंधळ
सूरज निकम हा नामवंत मल्ल होता. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेञातील अनेक किताब पटाकविले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना सूरजने आस्मान दाखवले आहे. परंतू शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आपली जीवन यांत्रा संपवली आहे. शुक्रुवारी सूरजच्या निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेञासह सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. आता पै. सुरज याने आत्महत्या का केली, याबाबत पोलिस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana : कोण करू शकतो अर्ज, कोणत्या कागदपत्रांची गरज? जाणून घ्या सर्व
कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आधी सूरजच्या वडिलांचे निधन झालं होतं आणि त्यामुळे तो व्यथित झाला होता. सूरजच्या निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सूरजच्या निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शनिवारी दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT