Mazi Ladki Bahin Yojana : कोण करू शकतो अर्ज, कोणत्या कागदपत्रांची गरज? जाणून घ्या सर्व
Mazi ladki bahin yojana details in marathi : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. ही योजना नेमकी काय आणि कोण पात्र आहेत... जाणून घ्या सर्व माहिती...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती

माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे

माझी लाडकी बहीण योजना अर्ज भरण्याची प्रक्रिया
Mazi ladki bahin yojana : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना! या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे. माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो आणि त्यासाठीची प्रक्रिया काय? हेच समजून घ्या... (how to apply for mukhyamantri mazi ladki bahin yojana)
सरकारने योजनेसंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यात योजनेबद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहेत.
कोणाला लाभ मिळणार?
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.