आधी 'वेलेंटाईन डे' अन् दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला संपवलं, तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन सगळंच सांगितलं

मुंबई तक

Crime News : प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाणे गाठलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण बिंदू मांझीने त्याची प्रेयसी गीता देवीचा गळा दाबून संपवलं, नंतर तरुणाने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमप्रकरणातून तरुणाने विधवा महिलेची केली हत्या

point

'वॅलेंटाईन डे' साजरा केल्यानंतर तरुणाचं हैवानी कृत्य

Crime News : बिहारच्या गया जिल्ह्यात शेरघाटी पोलीस ठाणे परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाणे गाठलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण बिंदू मांझीने त्याची प्रेयसी गीता देवीचा गळा दाबून संपवलं, नंतर तरुणाने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला.

हे ही वाचा : जालन्यात विवाहितेचा अमानुष छळ, माहेरहून पैसे आणण्यास टाकला दबाव, पीडितेनं गळफास घेत संपवलं जीवन

आधी 'वॅलेंटाईन डे' साजरा केला, नंतर तरुणाने महिलेचा गळा दाबून संपवलं

पोलिसांनी तरुणीचा मृतदेह नजीकच्या शेतातून ताब्यात घेतला. या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. फॉरेन्सिक  लॅब पथकाला घटनास्थळी बोलावले आणि त्यांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तरुणाने तरुणीचा गळा दाबून हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. दरम्यान मृत्यूचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. मृतदेह शवविच्छेदनेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. 

महिला विधवा असल्याची माहिती

या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या हत्येची पुष्टी झाली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली, तसेच महिला विधवा होती आणि तिचे काही काळापासून आरोपी बिंदू मांझीशी प्रेमसंबंध होते. 

नातेसंबंधातील तणावातूनच हत्येचा संशय 

तपासातून समोर आले की दोघांमध्ये काही कारणांवरून वाद होता. नातेसंबंधातील तणावातूनच ही हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. शवविच्छेदन आणि सखोल चौकशीनंतर खरे कारण स्पष्ट होईल. घटनेच्या वेळी इतर कोणी उपस्थित होते का याचाही पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात महिलेच्या कुटुंबातील कोणीही पुढे आलेलं नाही, यामुळे प्रकरणातील एकूण माहिती गोळा करणे कठीण होऊन बसले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp