आईला झाली दुसऱ्या लग्नाची घाई, 8 वर्षांच्या लेकीला फेकले रेल्वेखाली; धक्कादायक प्रकरण
एका आईने आपल्या दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा करण्यासाठी स्वतःच्या 8 वर्षांच्या चिमुरडीला चालत्या ट्रेनसमोर फेकून दिले. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर कृषी विभागात नोकरी मिळालेली ही महिला आपल्या मुलीला अडथळा मानू लागली होती, ज्याचा शेवट एका भीषण हत्याकांडात झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईला झाली दुसऱ्या लग्नाची घाई
8 वर्षांच्या लेकीला फेकले रेल्वेखाली
धक्कादायक प्रकरण
Crime News : मध्य प्रदेशातील नर्मदापुरममधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा करण्यासाठी स्वतःच्या 8 वर्षांच्या चिमुरडीला चालत्या ट्रेनसमोर फेकून दिले. अंजू राजपूत असे या निर्दयी मातेचे नाव असून, तिने आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेत ढकलले. 17 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर कृषी विभागात नोकरी मिळालेली ही महिला आपल्या मुलीला अडथळा मानू लागली होती, ज्याचा शेवट एका भीषण हत्याकांडात झाला.
मुलीला रेल्वे रुळावर ढकलले
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अंजू 17 मार्चला आपल्या मुलीसह रेल्वे स्थानकावर बराच वेळ संशयास्पद रितीने फिरत होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 'तमिळनाडू एक्सप्रेस' फलाट क्रमांक एकवर येत असतानाच, संधी साधून अंजूने आपल्या मुलीला रेल्वे रुळावर फेकले. या घटनेमुळे स्थानकावर प्रचंड खळबळ उडाली आणि उपस्थित प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. जीआरपी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील मुलीला रेल्वे रुळावरून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा : 'मित्रांनी प्राध्यापकासोबत अफेअर असल्याच्या अफवा पसरवल्या', डॉक्टर निकिताची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट
उपचारादरम्यान मृत्यू
अपघातामुळे मुलीच्या शरीरातील अनेक अवयवांना गंभीर इजा झाली होती. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने भोपाळला हलवण्यात आले. तिथे तब्बल 13 दिवस ही चिमुरडी मृत्यूशी झुंज देत होती, मात्र 30 मार्च रोजी उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता, परंतु मुलीच्या मृत्यूनंतर आता या गुन्ह्याचे रूपांतर हत्येच्या कलमात करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक करून न्यायालयात हजर केले, तिथून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
हे ही वाचा : बहिणीला गवताचा भारा उचलायला बोलावले अन् चुलत भावाने केलं कांड, प्रायव्हेट पार्टला इजा अन्..
दुसऱ्या लग्नासाठी मुलीला संपवले
जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय चौकसे यांनी सांगितले की, तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजूचे पती वारल्यानंतर तिला शासकीय नोकरी मिळाली होती, मात्र तिला दुसरे लग्न करायचे होते. हे लग्न करण्यात तिची मुलगी अडथळा ठरत असल्याने तिने मुलीला संपवण्याचा कट रचला. विशेष म्हणजे, यापूर्वीही तिने मुलीला मारण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकावर आणले होते, परंतु त्यावेळी तिला धैर्य एकवटता आले नव्हते. अखेर 17 मार्चला तिने आपल्या क्रूर योजनेची अंमलबजावणी करून आई आणि मुलीच्या नात्याला कायमचा कलंक लावला.









